मुंबई

पालीत ‘महाराजस्व समाधान शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

पालीत ‘महाराजस्व समाधान शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
महिला, शेतकरी व सामान्य जनतेची विक्रमी उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. १५ (वार्ताहर)ः शासकीय योजना आणि महसूल विभागाच्या सेवा थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ टप्पा क्रमांक १ ला पाली येथे प्रचंड प्रतिसाद मिळाला. मंडळ पालीच्या वतीने बल्लाळेश्वर गणपती मंदिरातील भक्त निवास क्रमांक १ येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शेकडो महिला, शेतकरी आणि सामान्य नागरिकांनी उपस्थित राहून प्रशासकीय सेवांचा लाभ घेतला.
या शिबिरात सातबारा उतारे, फेरफार नोंदी, नामांतरण, वारस नोंद प्रक्रिया, उत्पन्न, जाती आणि निवासी दाखले अशा १५ हून अधिक सेवा महसूल विभागातर्फे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत झाली.
या कार्यक्रमाला कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाचे सहआयुक्त रवी पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या शिबिरास निवासी नायब तहसीलदार भारत फुलपगारे, महसूल नायब तहसीलदार ज्ञानेश्वर अडसुळे, भूमी अभिलेख उपअधीक्षक साजिद शेख, निवडणूक नायब तहसीलदार नकुल पोळेकर, तालुका कृषी अधिकारी, पुरवठा निरीक्षण अधिकारी सुखदेव वाढणकर, मंडळ अधिकारी अंकुश साळवे व गणेश साळुंखे, ग्राम महसूल अधिकारी विमल घोलवे यांच्यासह कृषी व भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


फोटो ओळ- पाली ः महाराजस्व समाधान शिबिरात उपस्थित लाभार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुधागड-पालीचे तहसीलदार उत्तम कुंभार. (छायाचित्र, अमित गवळे)
फोटो ओळ, पाली, शिबिरासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला, शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते. (छायाचित्र, अमित गवळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

Indapur Accident : इंदापूरमध्ये भरधाव कारचा थरार; झाडाखाली उभ्या तीन वाहनांना धडक

SCROLL FOR NEXT