मशिदीत ‘समता इफ्तार’
संविधानिक मूल्यांसह सामाजिक ऐक्याचा संदेश
पाली, ता. २१ (वार्ताहर) ः ‘चला संविधानिक मूल्यांसह इफ्तार करूया’ या प्रेरणादायी संकल्पनेतून एका आगळ्यावेगळ्या ‘समता इफ्तार’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिवराय ते भिमराय समता मार्च या उपक्रमांतर्गत महाड येथे मशिदीमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाने सामाजिक सलोखा आणि बंधुतेचा एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
संविधान गुणगौरव समितीचे नुरखाँ पठाण यांनी संविधानाबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले. याप्रसंगी विविध समाजघटकांनी एकत्र येत इफ्तारमध्ये सहभाग नोंदवला. केवळ उपवास सोडणे एवढ्यापुरता हा कार्यक्रम मर्यादित न राहता, समाजात समता आणि सामाजिक ऐक्याची भावना दृढ करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. या उपक्रमाला उपस्थित नागरिकांकडून उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सध्याच्या काळात अशा प्रकारचे कार्यक्रम सामाजिक सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी आणि संविधानिक मूल्ये तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वाचे ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
महाडमध्ये सामाजिक एकतेचे वातावरण
कार्यक्रमादरम्यान भारतीय संविधान आणि इस्लाम-समता व बंधुतेचा संदेश या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूलभूत मूल्ये आणि इस्लामची शिकवण यांच्यात असलेले साम्य मांडण्यात आले. मानवी मूल्ये जपण्यासाठी संविधानिक जाणीव असणे किती आवश्यक आहे, यावर नुरखाँ पठाण यांनी प्रकाश टाकला. या समता इफ्तारमुळे महाडमध्ये सामाजिक एकतेचे वातावरण अधिक दृढ झाल्याचे पाहायला मिळाले.
फोटो ओळ,
पाली ः मशिदीत ‘समता इफ्तार’मध्ये संविधानिक मूल्यांसह सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.