मुंबई

पालीमध्ये पोलिसांकडून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा सामाजिक सलोख्याचे दर्शन

CD

पालीमध्ये पोलिसांकडून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा
पाली, ता. २१ (वार्ताहर) ः पवित्र रमजान आणि ईद-उल-फित्रनिमित्त शनिवारी (ता. २१) तालुक्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यानिमित्त पाली पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक हेमलता शेरेकर यांनी मशिदीत जाऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यामुळे सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे दर्शन घडले.
याप्रसंगी हेमलता शेरेकर यांनी पाली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सुलतान बेनसेकर यांना पुष्पगुच्छ देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मशिदीत उपस्थित असलेल्या इतर मुस्लिम बांधवांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या. सण-उत्सव हे समाजाला जोडण्याचे काम करतात. अशा प्रसंगी एकमेकांच्या आनंदात सहभागी झाल्याने सामाजिक ऐक्य अधिक मजबूत होते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी हेमलता शेरेकर यांच्यासोबत उपनगराध्यक्ष सुलतान बेनसेकर आणि पाली पोलिस ठाण्यातील इतर पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि मुस्लिम समुदायातील प्रतिष्ठित नागरिक व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यात सर्वत्र शांततेत आणि आनंदी वातावरणात ईद साजरी करण्यात आली.

फोटो ओळ,
पाली ः रमजाननिमित्त मशिदीमध्ये जाऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhopal Child Abuse Case : संतापजनक ! ७५ वर्षीय वकिलाकडून ५ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, घरात खेळायला आली अन्...

बापरे! मिलिंद सोमण यांचा वयाच्या ६० व्या वर्षी नवा विक्रम, युरोपमधून आफ्रिकेत पोहत गेले, पोस्ट करत म्हणाले...

Latest Marathi News Live Update : रसवंतीसाठी वापरल्या जाणाऱ्या उसाच्या दरात तिपटीने वाढ

Solapur Crime: मंगळवेढ्यात पहाटे एटीएम फोडून ७.७२ लाखांची चोरी; गस्ती पोलिसांनी पाठलाग केला पण चोरटे फरार..

MS Dhoni Update: माही IPL 2026 मध्ये एकतरी सामना खेळेल का? CSK च्या ताफ्यातून महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT