मुंबई

पालकांचे स्थलांतर, पण मुले शाळेतच रमली!

CD

पालकांचे स्थलांतर, पण मुले शाळेतच रमली!
रायगड जिल्हा परिषद शाळा आदिवासीवाडीचा प्रेरणादायी पॅटर्न
पाली, ता. २१ (वार्ताहर) ः सुधागड तालुक्यात नोव्हेंबर महिन्यानंतर रोजगारासाठी आदिवासी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते. याचा सर्वात मोठा फटका मुलांच्या शिक्षणाला बसतो. मात्र, या परंपरेला छेद देत रायगड जिल्हा परिषद शाळा रासळ आदिवासीवाडी येथील २३ विद्यार्थ्यांनी यंदा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. पालकांचे स्थलांतर झाले, तरीही मुले गावातच राहून आनंदाने शिक्षण घेत आहेत.
रासळ आदिवासीवाडी येथील सर्व कुटुंबे दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबरनंतर आपल्या पाल्यांना घेऊन कामासाठी बाहेर पडत असत. यामुळे अनेक शाळा ओस पडतात आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला खीळ बसते, परंतु यंदा शाळेने एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. जून महिन्यापासूनच विद्यार्थ्यांमध्ये शाळेची गोडी निर्माण करण्यासाठी भौतिक सुविधांमध्ये बदल करण्यात आले. कृतीद्वारे शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभवावर आधारित अध्यापन पद्धतीमुळे मुले अभ्यासात रमली. विद्यार्थ्यांमधील हा बदल पाहून पालकांनीही पाठिंबा देत मुलांना सोबत न नेता आजी-आजोबांकडे ठेवून कामावर जाणे पसंत केले.

मुलांमध्ये विविध मूल्यांची जोपासना
सध्या ही २३ मुले आपल्या आजी-आजोबांच्या सावलीत राहत दररोज न चुकता शाळेत येत आहेत. शाळेत नियमित आल्यामुळे त्यांच्यामध्ये चांगल्या सवयी रुजल्या असून, अभ्यासासोबतच मुलांमध्ये विविध मूल्यांची जोपासना होत आहे. ते स्वतः ज्ञानाची निर्मिती करत आहेत. शिक्षणात खंड पडू नये या जिद्दीने ही मुले आता आपल्या घरापासून दूर राहूनही अभ्यासात आघाडी घेत आहेत.

विद्यार्थ्याला एकदा शाळेची गोडी लागली की तो शाळेत टिकतो आणि शिकतोही, याचा प्रत्यय आम्हाला रासळ आदिवासीवाडी येथे आला. आम्ही विद्यार्थ्यांच्या अनुभवविश्वाशी सांगड घालून अध्यापन केल्यामुळे त्यांना शिक्षणाची आवड निर्माण झाली. आज ही मुले पालकांसोबत स्थलांतर न करता शाळेत आनंदाने ज्ञानार्जन करताना दिसतात. तेव्हा मिळणारा आनंद शब्दात मावत नाही. पालकांनी दाखवलेला विश्वास आणि मुलांची शिकण्याची जिद्द खरोखरच कौतुकास्पद आहे.
- स्मिता जगताप, मुख्याध्यापिका

फोटो ओळ,
पाली ः स्थलांतर न केलेली मुले शाळेत आनंदाने रमली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Cylinder Shortage : जनता 'गॅस' वर स्वयंपाक चुलीवर...; ग्रामीण भागासह शहरातील हाॅटेल व्यावसायिकांना फटका...

मशीद शेख यांची महाराष्ट्र केसरीत दमदार कामगिरी; सुवर्णपदकासह बुलेट आणि रोख पारितोषिकावर नाव कोरले

मोखाड्यात "घर घर संविधान" उपक्रमांतर्गत भीमगीतांची जल्लोषात मैफिल; लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीवर नाराजी

LPG Crisis: ऊर्जा संकटात केंद्र सरकारचा मोठा निर्णय! LPG पुरवठ्यात 20% वाढ; वाटप 50% पर्यंत वाढवले, राज्यांना दिलासा

Latest Marathi News Live Update : सहा आमदारांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले

SCROLL FOR NEXT