गौळमाळ शाळेच्या शिक्षिका जयश्री फुंदे यांचा गौरव
माजी विद्यार्थ्यांकडून उपक्रम; ग्रामीण भागातील समर्पित सेवेची ग्रामस्थांकडून दखल
पाली, ता. २२ (वार्ताहर) ः सुधागड तालुक्यातील गौळमाळ धनगरवाडा येथील रायगड जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षिका जयश्री फुंदे यांचा माजी विद्यार्थ्यांनी नुकताच सत्कार केला. एकाच शाळेत सलग १५ वर्षे अविरत ज्ञानदान करून विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवणाऱ्या जयश्री फुंदे यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत मर्यादित साधनसामग्री आणि भौगोलिक आव्हानांवर मात करत १५ वर्षे सेवा देणे ही साधी बाब नाही. जयश्री फुंदे यांनी केवळ पुस्तकी ज्ञानच दिले नाही, तर संस्कारमूल्यांची जोपासना करत विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व समृद्ध केले. त्यांच्या याच समर्पित कार्याची पोचपावती म्हणून आज विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले माजी विद्यार्थी शाळेत एकत्र आले येत त्यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सावळाराम कोकरे तर प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक विद्यालय पाच्छापूरचे मुख्याध्यापक दीपक माळी आणि शाळेचे मुख्याध्यापक धर्माजी तांडेल उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थ लक्ष्मण बर्गे, रमेश बर्गे, भगवान कोकरे, विठ्ठल बर्गे, गणपत बर्गे, रामचंद्र कोकरे यांच्यासह अनिता बर्गे, पुष्पा कोकरे, देवकी केंडे, सुनिता कोकरे, रामीबाई बर्गे व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दीपक माळी म्हणाले की, विद्यार्थी चौथीपर्यंत या शाळेत शिकत असले, तरी जयश्री फुंदे यांनी त्यांच्याशी संपर्क कायम ठेवून त्यांना पुढील शिक्षणासाठीही मार्गदर्शन केले. एखादा शिक्षक १५ वर्षे एकाच गावात सेवा देतो आणि ग्रामस्थ त्यांची बदली होऊ देत नाहीत, हेच त्यांच्या यशाचे मोठे प्रमाण आहे.
विद्यार्थ्यांची प्रगती हीच मोठी भेट
जयश्री फुंदे म्हणाल्या, या शाळेतील १५ वर्षांच्या प्रवासात विद्यार्थ्यांची प्रगती हीच माझ्यासाठी मोठी भेट आहे. ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळेच शाळेत विविध सुविधा उभ्या राहू शकल्या. मिळालेले हे प्रेम मला पुढील प्रवासात ऊर्जा देणारे आहे.माजी विद्यार्थी रोशन कोकरे म्हणाले की, फुंदे यांनी आम्हाला घडवताना घेतलेली मेहनत आणि दिलेल्या संस्कारांमुळेच आज आम्ही समाजात सन्मानाने उभे आहोत. आमच्या आयुष्याला योग्य दिशा मिळाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.