मुंबई

अलिबागचा पांढरा कांदा विक्रीसाठी सज्ज

CD

अलिबागचा पांढरा कांदा विक्रीसाठी सज्ज
जीआय मानांकनामुळे पोषक वातावरण; शेतकऱ्यांचीही आर्थिक उन्नती
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २३ : औषधी गुणधर्म असणारा अलिबागचा पांढरा कांदा बाजारात दाखल झाला आहे. या कांद्याला स्थानिकांसह पर्यटकांचीही पसंती मिळत आहे. पांढऱ्या कांद्याला जीआय मानांकन मिळाल्यानंतर झालेली प्रसिद्धी आणि कृषी विभागाने आखलेल्या विविध प्रोत्साहन योजनांमुळे पांढऱ्या कांद्याच्या बाजारपेठेला अलिबाग तालुक्यात पोषक वातावरण निर्माण झाले आहे. याचा फायदा उचलण्यास येथील शेतकरीही सज्ज झालेत.
अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा चव, टिकाऊपणा, आणि दर्जासाठी राज्यभरात प्रसिद्ध आहे. तालुक्यातील कार्ले, तळवली, खंडाळे, नेहुली या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. भातकापणीनंतर साधारण ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी शेतकरी पांढऱ्या कांद्याची लागवड करतात. यंदा सुमारे २५० हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली आहे. सध्या ८० टक्के कांद्याची काढणी झाली असून हा कांदा बाजारात दाखल झाला आहे. या वर्षी पाऊस लांबल्याने पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले. त्यामुळे कांद्याचे पिकही चांगले आले असून उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा शेतकरी बांधव व्यक्त करीत आहेत. कांद्याची मोठी माळ २५० ते ३०० रुपयेपर्यंत तर लहान माळ २०० रुपयेपर्यंत विकली जात आहे.

२५० ते ३०० रुपयेपर्यंत दर
यंदा सुमारे २५० हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली आहे. सध्या ८० टक्के कांद्याची काढणी झाली असून हा कांदा बाजारात दाखल झाला आहे. या वर्षी पाऊस लांबल्याने पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले. त्यामुळे कांद्याचे पिकही चांगले आले असून उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा शेतकरी बांधव व्यक्त करीत आहेत. कांद्याची मोठी माळ २५० ते ३०० रुपयेपर्यंत तर लहान माळ २०० रुपयेपर्यंत विकली जात आहे.

या वर्षी पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे कांद्याचे पिकही चांगले आले आहे. सध्या आम्ही कांदा बाजारात आणला आहे. पर्यटकसुद्धा माळा आवडीने घेतात. जीआय मानांकनामुळे अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला मागणी वाढत असून त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांना मिळत आहे.
- सुरेश पाटील, खंडाळा, शेतकरी

रायवळ आंबेही बाजारात
पांढऱ्या कांद्याच्या माळांसह सध्या रामफळ, रायवळ आंबेही काही ठिकाणी विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत. ३०० रू. डझन दराने रायवळ आंबे विकत असल्याचे प्रतीक्षा राऊत या महिला विक्रेतीने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

महागड्या फेरारीतही हार्दिक ऐकतो 'हा' मंत्र; म्हणाला - "याहून पॉझिटिव्ह काहीच नाही!" पाहा Viral Video

इंडस्ट्रीतल्या 'या' अभिनेत्री आहेत एकमेकींच्या जाऊबाई; एक स्टार प्रवाहवर तर एक झी मराठीवर करतेय काम

Satara ZP News: महायुतीत ‘मिठाचा खडा’! साताऱ्याच्या राड्याने सत्ताधाऱ्यांत फूट? भाजप-शिंदे गटात अंतर्गत असंतोष उफाळला

खरातच्या पायाच पडणार! मला तो सारखं बोलवायचा, एकदा अर्ध्या वाटेत गेलो अन्...; जितेंद्र आव्हाडांनी सांगितला अनुभव

SCROLL FOR NEXT