मुंबई

''गुढीपाडवा, पट वाढवा'' अभियानाने नवघर शाळेत शिक्षणाची गुढी नव्या चिमुकल्यांचे शाही स्वागत शाळा प्रवेशोत्सवाने झाला नवीन शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा सेल्फी पॉईंट ठरला आकर्षणाचे केंद्र

CD

‘गुढीपाडवा, पट वाढवा’ अभियानाने नवघर शाळेत शिक्षणाची गुढी
प्रवेशोत्सवाने नवीन शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा
पाली, ता. २४ (वार्ताहर) ः सुधागड तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा नवघर येथे मंगळवारी (ता. २४) ‘गुढीपाडवा, पट वाढवा’ या अभिनव अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत पहिलीच्या विद्यार्थ्यांचा ‘शाळा प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा केला. शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून शिक्षणाची गुढी उभारण्यात आली.
पहिलीसाठी यंदा पाच विद्यार्थ्यांनी आज आपल्या पालकांसह शाळेत उपस्थित राहून औपचारिक प्रवेश घेतला. पहिल्याच दिवशी मुलांच्या मनात शाळेविषयी गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने शिक्षकांनी या चिमुकल्यांना पुष्पगुच्छ, खाऊ आणि शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचे उत्साहात स्वागत केले. हे स्वागत पाहून मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापक संगिता बैकर होत्या. त्यांनी आपल्या मनोगतातून नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. उपशिक्षक राजेंद्र अंबिके यांनी गुढीपाडवा, पट वाढवा या अभियानाचे महत्त्व पालकांना पटवून दिले. जास्तीत जास्त मुलांनी जिल्हा परिषद शाळेच्या दर्जेदार शिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शिक्षिका वृषाली गुरव, उपशिक्षक शीतल पाटील, रुपाली लेंडवे आणि श्वेता जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

सेल्फी पॉईंट ठरले विशेष आकर्षण
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण सेल्फी पॉईंट ठरले आहे. या ठिकाणी माता-पालकांनी आपल्या पाल्यांसोबत फोटो काढून हा ऐतिहासिक क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. शाळेचा संपूर्ण परिसर फुले आणि आकर्षक रांगोळ्यांनी सजवण्यात आल्यामुळे शाळेला एखाद्या उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. पालकांनी शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे भरभरून कौतुक केले असून, गावपातळीवर पट नोंदणी वाढवण्यासाठी हा एक सकारात्मक पुढाकार असल्याचे मत व्यक्त केले आहे.

शिक्षणमंत्री यांच्या संकल्पनेतून नुकतेच गुढीपाडवा-पट वाढवा हे अभियान सुरू झाले आहे. नवघरमधील नवीन दाखल मुलांचे प्रवेश वाढावेत यासाठी हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल. सरकारी शाळेतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
- राजेंद्र अंबिके, आयडॉल शिक्षक, शाळा-नवघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: धनगर आरक्षणासाठी मनोज जरांगे आझाद मैदनात! बोऱ्हाडेंना पाठिंबा; म्हणाले, सहा कोटी मराठे...

बीएमसीचा ऐतिहासिक निर्णय! हजारो कर्मचाऱ्यांना मिळणार कायमस्वरूपी घर; पण कोणत्या? जाणून घ्या...

शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; मुख्य आरोपी वर्षभरानंतर अटकेत

Gas News : गॅस टंचाईमुळे ओतूर-माळशेज पट्ट्यात पुन्हा पेटल्या चुली

Bank News : मार्च एंडची लगबग; जिल्हा बँकेत शेतकऱ्यांची गर्दी वाढली

SCROLL FOR NEXT