पथनाट्याद्वारे अनुसूचित जाती व नवबौद्ध योजनांची जनजागृती
पाली येथील वडेर हायस्कूलमध्ये उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. २५ (वार्ताहर) महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘अनुसूचित जाती व नवबौद्ध विकास’ विशेष घटक योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पाली येथील ग. बा. वडेर हायस्कूल आणि ग. ओसवाल कनिष्ठ महाविद्यालय येथे पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली.
या पथनाट्यातन शासकीय योजनांची क्लिष्ट माहिती सोप्या भाषेत समजून सांगण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शिष्यवृत्ती योजना, त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत आणि अटी यावर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम मार्गदर्शक ठरत असल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
फोटो ओळ, पाली, येथील ग. बा. वडेर हायस्कूलच्या रंगमंचावर कलाकारांनी पथनाट्याद्वारे ''अनुसूचित जाती व नवबौद्ध विकास'' योजनांची माहिती दिली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले विद्यार्थी. (छायाचित्र, अमित गवळे)
फोटो ओळ, पाली, येथील ग. बा. वडेर हायस्कूलच्या रंगमंचावर कलाकारांनी पथनाट्याद्वारे ''अनुसूचित जाती व नवबौद्ध विकास'' योजनांची माहिती दिली. (छायाचित्र, अमित गवळे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.