लखनौकडून चेन्नईचा धुव्वा! ऋतुराज गायकवाडने पराभवानंतर मान्य केली मोठी चूक, म्हणाला आम्ही...

Ruturaj Gaikwad: लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने संघाच्या कामगिरीबाबत प्रतिक्रिया दिली. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकणे आवश्यक असल्याचे त्याने स्पष्ट केले.
Ruturaj Gaikwad

Ruturaj Gaikwad

esakal

Updated on

Ruturaj Gaikwad: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ च्या हंगामात काल चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि लखनौ सुपर जायंट्स(LSG) यांच्यात हंगामातील ५९ वा सामना खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनौ संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करायला आलेल्या चेन्नई संघाने आपल्या निर्धारित २० षटकांत १८७ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये कार्तिक शर्माने (Kartik Sharma) शानदार अर्धशतक झळकावले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com