२२ हजार लाडक्या बहिणींची ई-केवायसी अपूर्ण
३१ मार्च अंतिम मुदत; ई-केवायसी न केल्यास लाभापासून राहणार दूर
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २५ : जिल्ह्यात ‘लाडकी बहीण’ योजनेंतर्गत हजारो महिलांच्या ई-केवायसी प्रक्रियेत त्रुटी आढळून आल्याने लाभ मिळण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी तत्काळ ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात एकूण ६३ हजार ७८२ महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याची नोंद असली तरी तांत्रिक कारणांमुळे अनेकांची प्रक्रिया अपूर्ण किंवा चुकीची राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार सुमारे २२ हजार ३७५ महिलांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा पूर्ण केलेली नाही.
ई-केवायसी अपूर्ण राहिल्यास संबंधित लाभार्थ्यांना योजनेचा आर्थिक लाभ मिळू शकणार नाही. त्यामुळे पात्र महिलांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आवश्यक कागदपत्रांसह ई-केवायसी प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी स्पष्ट केले. यासाठी ३१ मार्च अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून, मुदतीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे. तसेच कोणतीही अडचण आल्यास जवळच्या सेवा केंद्राशी किंवा संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचेही सांगण्यात आले आहे. प्रशासनाच्या या सूचनेनंतर उर्वरित लाभार्थ्यांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तालुकानिहाय्य आकडेवारी
अलिबाग : २ हजार ६३३
कर्जत : १ हजार ९६२
खालापूर : १ हजार ७७२
महाड : १ हजार ६५६
माणगाव : १ हजार ७९९
म्हसळा : ८०८
मुरूड : ७१३
पनवेल : ५ हजार १४०
पेण : १ हजार ५३३
पोलादपूर : ४२७
रोहा : ८४४
श्रीवर्धन : ७८७
सुधागड-पाली : ४८९
उरण : १ हजार ३७६
तळा : ४३६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.