मुंबई

भोंदूबाबा अशोक खरातचा अंनिसकडून निषेध

CD

भोंदूबाबा अशोक खरातचा अंनिसकडून निषेध
अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या वतीने निदर्शने; दोषींवर कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २६ : भोंदूबाबा म्हणून परिचित असलेले अशोक खरात यांच्या कृत्याच्या विरोधात अलिबागमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (ता.२५) निदर्शने करण्यात आली. नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली शांततामय मार्गाने हा निषेध व्यक्त करण्यात आला.
अशोक खरात प्रकरण सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. त्याच्या विरोधात पोलिसांनी कारवाईदेखील सुरू केली आहे. नाशिक येथील भोंदू अशोक खरात याच्या कृत्याविरोधात रायगड जिल्ह्यात देखील प्रचंड संताप असून वेगवेगळ्या संस्था संघटनांकडून निषेध व्यक्त केला आहे. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने अलिबागमध्ये बुधवारी खरातप्रकरणी निषेध व्यक्त करण्यात आला. अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले. त्यांनी खरात विरोधात निषेध व्यक्त करीत निदर्शने केली. त्यानंतर जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांना निवेदन देत खरात यांच्या विरोधात कारवाई रण्याची मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT