राज्यस्तरीय हॅकेथॉनमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रोटोटाइपचा दबदबा
स्पर्धेत हिंगोली प्रथम, सिंधुदुर्ग द्वितीय तर मुंबई उपनगर तृतीय
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. ३० (वार्ताहर): राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आणि ''लीडरशिप फॉर इक्विटी'' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवशीय ‘राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धा २०२५-२६’चा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच उत्साहात संपन्न झाला. या स्पर्धेत हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, ईडोळी या शाळेने प्रथम क्रमांक तर सिंधुदुर्ग जिल्ह्याने द्वितीय आणि मुंबई उपनगरने तृतीय क्रमांक पटकवला.
तीन दिवस चाललेल्या या कल्पक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी फिजिकल कम्प्युटिंग किटचा वापर करून नावीन्यपूर्ण प्रोटोटाइप तयार केले. विजेत्या शाळांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच सहभागी झालेल्या इतर सर्व जिल्ह्यांतील शाळांना त्यांच्या उल्लेखनीय प्रयत्नांसाठी उत्तेजनार्थ पारितोषिके व प्रमाणपत्रे देण्यात आली. रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा, नवघरनेदेखील उत्तम कामगिरी केली.
राज्यभरातील उत्कृष्ट प्रकल्प सादर केलेल्या ३४ जिल्ह्यांतील १०२ विद्यार्थी आणि ३४ शिक्षक राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडले गेले. विद्यार्थ्यांनी शेती, पर्यावरण संरक्षण, सायबर सुरक्षा, शिक्षण आणि लिंग समभाव या पाच महत्त्वाच्या विषयांवर तंत्रज्ञानाच्या मदतीने नावीन्यपूर्ण प्रोटोटाइप सादर केले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनाला शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉ. हेमंत वसेकर, एलएफईचे को-फाउंडर व प्रभारी सीईओ सिद्धेश शर्मा, सहसंचालक अरुणा यादव, दीपाली जोगदंडे तसेच एलएफई को-फाउंडर दामिनी माईणकर, संचालक दीपक कांबळे, वरिष्ठ व्यवस्थापक तुषार झा, व्यवस्थापक तुकाराम लाळगे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळ, पाली, मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धेचे प्रथम पारितोषिक स्वीकारताना हिंगोली जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व विद्यार्थी. (छायाचित्र, अमित गवळे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.