मुंबई

पालीतील ऐतिहासिक ३४० वर्षांची परंपरा असलेल्या श्री मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

CD

मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात
पाली, ता. ३ (वार्ताहर) ः पाली शहरातील कसबे पेठ येथील ऐतिहासिक आणि प्राचीन श्री मारुती देवस्थान येथे यंदाचा हनुमान जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती.
उत्सवाचे नियोजन अध्यक्ष अभिजीत चांदोरकर व विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. धनंजय गद्रे यांनी आपल्या कीर्तनातून हनुमान जन्माची कथा आणि हनुमंताची महती भाविकांसमोर मांडली. तसेच, स्वरसाधना व सिद्धकला भजनी मंडळाच्या भजनांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. महिलांसाठी आयोजित श्री चैत्रागौरी हळदीकुंकू कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाला. यासोबतच श्री हनुमान तांडव आणि श्रीराम तांडव स्तोत्र पठणाने मंदिरातील वातावरण चैतन्यमय झाले होते. यावर्षीचे विशेष म्हणजे चांदीचा मुकुट परिधान केलेली श्रींची भव्य मूर्ती विलोभनीय दिसत होती.

३४० वर्षांचा ऐतिहासिक वारसा
शके १६०८ मध्ये स्थापन झालेले हे मंदिर पालीकरांच्या अस्मितेचे प्रतीक आहे. समर्थ रामदास स्वामींच्या परंपरेतील संतांनी या साडेपाच ते सहा फूट उंच भव्य मूर्तीची स्थापना केल्याचे सांगितले जाते. १८८६ आणि १९३६ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला, तरी मूळ मूर्ती आणि आध्यात्मिक वारसा आजही जपला गेला आहे.

फोटो ओळ,
पाली ः हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित चैत्रागौरी हळदीकुंकू कार्यक्रमात पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या पालीतील महिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT