मुंबई

सुधागड तालुक्यात बुद्धकालीन लेण्यांच्या संवर्धनासाठी पाऊल गोमाशी लेणी येथे स्वच्छता मोहीम संपन्न

CD

बुद्धकालीन लेणींच्या संवर्धनासाठी पाऊल
सुधागडमधील गोमाशी येथे स्वच्छता मोहीम
पाली, ता. ५ (वार्ताहर) ः सुधागड तालुक्याला लाभलेला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी सुधागड तालुका बौद्धजन पंचायत (मुंबई) संस्थेच्या महिला मध्यवर्ती कमिटीने पुढाकार घेतला आहे. तालुक्यातील बुद्धकालीन लेण्यांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने महिला अध्यक्षा अस्मिता अविनाश कांबळे यांच्या संकल्पनेतून गोमाशी येथील लेणी परिसरात नुकतीच विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
सुधागड तालुक्यात अनेक महत्त्वपूर्ण बुद्धकालीन लेणी अस्तित्वात आहेत. या लेणींचे जतन करणे, त्यांचे विद्रूपीकरण थांबवणे आणि बुद्धांचे अस्तित्व टिकवून ठेवणे या उद्देशाने बौद्धजन पंचायत संस्थेने लेणी स्वच्छता व संवर्धन मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान उपस्थित पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी लेणी परिसरातील झाडलोट करून स्वच्छता केली. लेणीच्या आजूबाजूला वाढलेले गवत आणि कचरा काढून परिसर चकाचक करण्यात आला. या मोहिमेत महाविद्यालयीन तरुण-तरुणींसह शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. कार्यक्रमाला सुधागड तालुका मध्यवर्ती कमिटीचे माजी सचिव राजेश गायकवाड, महिला मध्यवर्ती कमिटीच्या सचिव नीता कांबळे, प्रियांका ठवरे, किरण कांबळे, अविनाश कांबळे आणि सचिव साक्षी कांबळे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मुग्धा कांबळे, तेजस मोते, गुड्डी कांबळे, सुजल गायकवाड, आर्यन गायकवाड, दक्ष कांबळे, रचना कांबळे, अथर्व गायकवाड, सम्यक महाडीक, हर्ष क्षीरसागर, प्रांजल क्षीरसागर या विद्यार्थ्यांनी उत्साहाने श्रमदान केले. आपल्या तालुक्यातील लेण्या पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक येतात. या ऐतिहासिक वारशाचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. यापुढील काळातही अशा मोहिमा अधिक जोमाने इतर लेण्यांवरही राबविण्यात येतील, असे अस्मिता कांबळे यांनी सांगितले.

दात्यांचे मोलाचे सहकार्य
मोहिमेच्या यशस्वितेसाठी विविध स्तरांतून मदत लाभली. राजेश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. माजी पोलिस अधिकारी दिलीप यशवंत शिर्के यांनी सहभागी विद्यार्थ्यांसाठी दोन वेळच्या अल्पोहाराची व्यवस्था केली. अस्मिता कांबळे व नीता कांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी वाहनांची सोय केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT