आरटीई प्रवेशासाठी आज सोडत
४७८४ जागांकरिता ९५०२ अर्ज; गैरप्रकार टाळण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ५ : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी सोमवार (ता. ६) सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीमध्ये प्रवेश जाहीर होणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी, प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार असून, सोडतीनंतर शाळांतील प्रत्यक्ष प्रवेश सुरू केले जाणार आहेत.
आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या अंतरातील शाळा निवडण्याची शिक्षण विभागाने घातलेली अट उच्च न्यायालयाने रद्द केली. त्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आधी अर्ज भरलेल्या पालकांना पुन्हा अर्ज भरण्यासाठी, तसेच अर्ज न भरलेल्या पालकांना अर्ज भरण्याची संधी दिली. रायगड जिल्ह्यातील २७० शाळांमधील चार हजार ७८४ जागांकरतिा नऊ हजार ५०२ अर्ज आलेले आहेत. या सर्वांना प्रवेश देणे शक्य नसल्याने सोमवार (ता. ६) सोडत प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातून दिली. राज्यात एकाच दिवशी ही सोडत जाहीर करण्यात येत असून, त्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी या प्रक्रियेचे थेट यूट्युब प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे.
गैरप्रकारांबाबत तक्रार करण्याचे आवाहन
आरटीई प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप केला जात नाही. पालकांना पाल्यांच्या प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारची प्रलोभने दिली जात असल्यास अशा प्रलोभनांना बळी पडू नये. प्रवेशाबाबत कोणतेही गैरप्रकार निदर्शनास आल्यास प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेत गैरप्रकार आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.