टीबी रुग्णांसाठी फूड बास्केट किट्सचे वितरण
लाइट ऑफ लाइफ ट्रस्ट व आरोग्य विभागाचा संयुक्त उपक्रम; ११ रुग्णांना सहा महिन्यांचा आहार
पाली, ता. ६ (वार्ताहर) : क्षयरोग (टीबी) मुक्त भारताचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत पाली येथे ‘लाइट ऑफ लाइफ ट्रस्ट’च्या हेल्थकेअर टीमने तालुका आरोग्य कार्यालयाच्या सहकार्याने टीबी रुग्णांसाठी विशेष उपक्रम राबवला. ट्रस्टच्या हेल्थकेअर सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील ११ रुग्णांना सहा महिन्यांच्या ‘फूड बास्केट’ किटचे वितरण करण्यात आले.
उपचारासोबतच सकस आहाराचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येक रुग्णाला सहा किट देण्यात आली. एका किटमध्ये गहू १.५ किलो, तांदूळ दोन किलो, मूग एक किलो, तूरडाळ एक किलो, शेंगदाणे ५०० ग्रॅम, गूळ ५०० ग्रॅम, खाद्यतेल ८७५ ग्रॅम व सोयाबीन एक किलो या पोषक घटकांचा समावेश आहे. या आहारामुळे रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती वाढून उपचाराला गती मिळण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी, डॉ. गीतांजली राव हजारे व टीबी सुपरवायझर विशाल महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले. आरोग्य विभाग व ट्रस्टच्या समन्वयातून हा उपक्रम यशस्वी ठरला.
फोटो ओळ- पाली, टीबी रुग्णांना ‘फूड बास्केट’ किटचे वाटप करताना उपस्थित मान्यवर आणि लाभार्थी. (छायाचित्र, अमित गवळे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.