मुंबई

२८ लघुपाठबंधाऱ्यांमध्ये ४०.६४ जलसाठा

CD

रायगडमध्ये पाणीटंचाईची चाहूल
२८ लघु पाटबंधाऱ्यांमध्ये ४०.६४ टक्के जलसाठा; मुसळधार पाऊस पडूनही संकट
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ६ : मागील वर्षी मे ते ऑक्टोबर या कालावधीत रायगड जिल्ह्यात सरासरी तीन हजार १२८ मिमी इतका पाऊस पडूनही जिल्ह्यातील लघु पाटबंधाऱ्यांमधील जलसाठा चिंताजनकरीत्या घटल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील २८ लघु पाटबंधाऱ्यांमध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवळ ४०.६४ टक्के जलसाठा शिल्लक राहिल्याने आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या बंधाऱ्यांची एकूण साठवण क्षमता ६८.५१ दलघमी इतकी असून, सध्या केवळ २७.९७ दलघमी पाणी उपलब्ध आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना जलसाठ्यात होणारी घट प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. पुढील दोन महिने पाणीपुरवठा कसा सुरळीत ठेवायचा, हा मोठा प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर उभा राहिला आहे. लघू पाटबंधाऱ्यांतील पाण्यावर अनेक ग्रामीण पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. जलसाठा आणखी कमी झाल्यास या योजनांवर परिणाम होऊन काही भागांत पाणीपुरवठा विस्कळित होण्याची शक्यता आहे. तसेच शेतीसाठी लागणारे पाणी आणि जनावरांच्या पाण्याची उपलब्धता यावरही परिणाम होणार असल्याने ग्रामीण भागात चिंता वाढली आहे.

साचलेला गाळ कारणीभूत
कोलाडचे पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता मिलिंद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार २०२४ साली तुलनेने कमी पाऊस पडूनही याच कालावधीत ४२.२२ टक्के जलसाठा उपलब्ध होता. मात्र यंदा अधिक पाऊस असूनही साठा कमी होण्यामागे धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सलग मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागातून वाहून आलेला गाळ बंधाऱ्यांमध्ये साचल्याने उपयुक्त साठवण क्षमता घटली आहे. दरम्यान, संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी पाण्याचे काटेकोर नियोजन, गळती रोखणे आणि जलस्रोतांचे पुनर्भरण यावर भर देण्याची गरज व्यक्त होत असून, नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


२ एप्रिलपर्यंतचा जलसाठा (दलघमी)
वर्ष/जलसाठा/
२०२०/४४.२२
२०२१/३८.७३
२०२२/४८.१५
२०२३/२४.४६
२०२४/२५.७६
२०२५/२८.७७
२०२६/२७.७७

सद्य:स्थितीतील जलसाठा
फणसाड-मुरूड / ०.९९
वावा-तळा / २.३३
सुतारवाढी-रोहा / १.४७
आंबेघर-पेण /१.६७
श्रीगाव-अलिबाग / १.०२
कोंडगाव-सुधागड /०.७७
घोटवडे-सुधागड /०.१९
ढोकशेत-सुधागड / ०.००
कवेळे-सुधागड / ०.५२५
उन्हेरे-सुधागड / ०.१४
कार्ले-श्रीवर्धन / ०.९९
कुडली-श्रीवर्धन / ०.८९
रानीवली-श्रीवर्धन / ०.४२
पाभरे-म्हसळा / ०.७०
संदेरी-म्हसळा / १.५०
वरंध-महाड / ०.९५
खिडवाडी-महाड / १.०३
कोथुर्डे-महाड / ०.८७
खैरे-महाड / ०.७२
साळोख-कर्जत / ०.७४
अवसरे-कर्जत / ०.६१
भिलवले-खालापूर / १.११
कलोते-मोकाशी- खालापूर / २.११
डोणवत-खालापूर / १.३४
मोरबे- पनवेल / १.९९
बामणोली-पनवेल / १.३३
उसरण-पनवेल / १.०७
पुनाडे-उरण / ०.४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पावसाचा तांडव... कोलकाता-पंजाब सामना रद्द करावा लागला, १-१ गुणाने नेमका कोणाचा फायदा झाला?

रणवीरने केली अजून एक नक्कल, श्रेया घोषालने सुद्धा दिली साथ, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले... हा नाही सुधारणार

Court Decision: मोठी बातमी! बाप-लेकाच्या मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना फाशीची शिक्षा; तामिळनाडूतील कोर्टाचा निर्णय

New Labour Law: कर्मचाऱ्यांची लॉटरी! उरलेल्या सुट्ट्यांवर मिळणार थेट कॅश; एकही Leave वाया जाणार नाही, काय आहेत नवे नियम?

IPL 2026 Controvarsy: बस्सsss झालं... SRH ची मालकीण काव्या मारन संतापली, BCCI कडे आवेश खानसह दोन वादग्रस्त निर्णयाची तक्रार

SCROLL FOR NEXT