मुंबई

आरटीओची २२ हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई

CD

आरटीओची २२ हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई
१९.०८ कोटी रुपये तडजोड शुल्क; हेल्मेट न वापरणाऱ्या १० हजार ८५५ चालकांना दंड
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ९ : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पनवेल यांच्या वतीने मोटार वाहन कर व दंडवसुली मोहिमेत संपलेल्या आर्थिक वर्षात मोठी कारवाई करण्यात आली. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करत तब्बल १९.०८ कोटी रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे.
आरटीओ पनवेल कार्यालयाने वर्षभरात एकूण ८५ हजार ०१४ वाहनांची तपासणी केली. त्यापैकी २२ हजार ५६७ वाहनचालक विविध नियमभंग करताना आढळल्याने मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. हेल्मेट न वापरणाऱ्या १० हजार ८५५ वाहनचालकांवर सर्वाधिक कारवाई झाली. याशिवाय करार वाहनांत अनधिकृत माल किंवा प्राणी वाहतूक करणाऱ्या एक हजार ९६६ प्रकरणांवर, ऑटो रिक्षा नियमभंगाच्या दोन हजार १७७, अवैध प्रवासी वाहतुकीच्या २८० आणि स्कूलबस नियमभंगाच्या २१३ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली. रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आवश्यक असल्याचे आरटीओ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. वाहनचालकांनी आवश्यक कागदपत्रे बाळगून सुरक्षित वाहन चालवावे तसेच नियमांचे पालन करून रस्ता सुरक्षिततेस हातभार लावावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

कारवाई करण्यात आलेली वाहने
हेल्मेट न वापरणारे- १० हजार ८५५
अवैध विमा - ५ हजार ६८७
वेगमर्यादा ओलांडणारे- ५ हजार ६४२
ओव्हरलोड मालवाहतूक- २ हजार १३९
मोबाईल वापरणारे- ६०७

KKR vs LSG Live: अजिंक्य रहाणेच्या मेहनतीवर सहकाऱ्यांनी फिरवले पाणी; लखनौला दिली पुनरागमनाची संधी, कोलकातात मोठा ड्रामा

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर आग; शॉर्टसर्किटमुळे घटना घडल्याचा अंदाज

KKR vs LSG Live: चर्चा तर होणारच... अजिंक्य रहाणेचा अतरंगी Six! रिषभ पंतच्या मास्टरस्ट्रोकने LSG ला विकेट मिळवून दिली Video Viral

High Court on TET : अल्पसंख्याक शाळांमध्ये टीईटी बंधनकारक नाही; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण, शिक्षकांना दिलासा

119 इंच कंबर आणि 545 किलो वजन... 9 वर्षे अंथरुणाला खिळलेला, हा जगातील सर्वात मोठी कंबर असलेला माणूस

SCROLL FOR NEXT