गतिरोधकासाठी बहुजन विद्यार्थी संघटनेचा आंदोलनाचा इशारा
पाली, ता. १० (वार्ताहर) ः एमएसआरडीसीमार्फत कोट्यवधी खर्चून तयार केलेल्या पाली-खोपोली मार्गावरील खुरावले फाटा रस्त्यावरील प्रवास सध्या नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. या ठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, येथे तातडीने गतिरोधक बसवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा बहुजन विद्यार्थी संघटनेने दिला आहे. यासंदर्भात जिल्हाध्यक्ष अमित गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सुधागड तहसीलदार यांना एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे.
नवीन रस्ता झाल्यापासून या मार्गावर वाहनांचा वेग प्रचंड वाढला आहे. विशेषतः खुरावले फाटा येथे वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून, प्रशासनाने दुभाजकाची वारंवार मागणी करूनही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली नाही, तर बहुजन विद्यार्थी संघटना आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही या वेळी दिला.
फोटो ओळ ः पाली, निवेदन तहसीलदार उत्तम कुंभार यांना सुपूर्द करताना बहुजन विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित गायकवाड आणि इतर पदाधिकारी. (छायाचित्र, अमित गवळे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.