मुंबई

बाटू लोणेरेत ‘फुले-शाहू-आंबेडकर सप्ताह’ची जल्लोषात सुरुवात

CD

बाटू लोणेरेत ‘फुले-शाहू-आंबेडकर सप्ताह’ची जल्लोषात सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १० : लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ ११ ते १६ एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ‘फुले-शाहू-आंबेडकर सप्ताह’ उत्साहात साजरा केला जाणार आहे. विविध प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक विचारांची प्रेरणा देण्याचा प्रयत्न या सप्ताहातून करण्यात येत आहे.
११ एप्रिल रोजी सप्ताहाची सुरुवात महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त ‘१८ तास अभ्यास’ या अनोख्या उपक्रमाने होणार आहे. सुमारे ३०० विद्यार्थी सलग १८ तास अभ्यास करून बाबासाहेब आणि महात्मा फुले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणार आहेत. याच दिवशी प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार यांचे महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहे. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेब सन्मान रॅली काढण्यात येणार असून, कुलगुरूंच्या हस्ते बाबासाहेबांच्या जीवनावरील प्रदर्शनाचे उद्‍घाटन होणार आहे. हे प्रदर्शन १४ ते २० एप्रिल यादरम्यान सर्वांसाठी खुले राहणार आहे.
१५ एप्रिल रोजी प्रख्यात विचारवंत प्रा. डॉ. प्रदीप आगलावे यांचे व्याख्यान होणार असून, त्यानंतर सुपर शो ऑर्केस्ट्राद्वारे भीमगीतांचा कार्यक्रम रंगणार आहे. सप्ताहाची सांगता राजेंद्र रगडे यांच्या व्याख्यानाने होईल. या कार्यक्रमांचे आयोजन कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती उत्सव समितीमार्फत करण्यात येत असल्याची माहिती प्रा. सुवर्णा धोंगडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 ORANGE CAP: वैभव सूर्यवंशीची ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गरुड झेप! विराट कोहली, रोहित शर्मा टॉप फाईव्हमध्येही नाहीत...

RR vs RCB Live : शाब्बास वैभव... राजस्थानचा विजयी चौकार, विराटच्या रॉयल्सचा केला कचरा; IPL 2026 Point Table मध्ये दबदबा

RR vs RCB Live : १५ चेंडूंत ७४ धावा चोपल्या... Vaibhav Sooryavanshi च्या वादळासमोर गतविजेत्यांचा पालापाचोळा; ध्रुव जुरेलसोबत ८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

Local Megablock: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मुंबई लोकलच्या ‘या’ मार्गांवर जंबो ब्लॉक; वेळापत्रकात फेरबदल जाहीर

RR vs RCB Live : ४,४,४,६,६... वैभव सूर्यवंशीचे १५ चेंडूंत अर्धशतक; ३००+ चा स्ट्राईक रेट अन् जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमारची बेक्कार धुलाई

SCROLL FOR NEXT