मुंबई

ओमकार क्रीडा मंडळ वेश्वीच्या वतीने कबड्डी स्पर्धा

CD

ओमकार क्रीडा मंडळ वेश्वीच्या वतीने कबड्डी स्पर्धा
अलिबाग, ता. १३ (बातमीदार) : वेश्वी येथील ओमकार क्रीडा मंडळाच्या वतीने आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने कै. पूर्वा भगत स्मृती चषक २०२६ ही जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर आयोजित या स्पर्धेत एकूण ३२ संघांनी सहभाग घेतला. अंतिम फेरीत मरीआई धेरंड संघाने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला, तर जय हनुमान धेरंड संघ उपविजेता ठरला. खारीकपाडा संघ तृतीय आणि आंदोशी संघ चतुर्थ क्रमांकावर राहिला.
या स्पर्धेचे उद्‍घाटन पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह आणि शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते झाले. ओमकार क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या या स्पर्धेला महारष्ट्र राज्य कबड्डी असोसीएशनचे माजी सरकार्यवाह आस्वाद पाटील, अलिबाग नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, सवाई पाटील, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्यवाह चित्रा पाटील, वेश्वीच्या उपसरपंच आरती पाटील, सदस्य अनंत मुळूस्कर, राजेंद्र राऊळ, माजी नरेश, अरुण पाटील, कबड्डी निरीक्षक जनार्दन पाटील आदी मान्यवरांनी भेट दिली.

चौकट
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा किताब ऋत्विक पाटील याने जिंकला. स्मित पाटील याला उत्कृष्ट चढाई, ओमकार मेस्त्री याला उत्कृष्ट पकड, तर रोहित शेळके याला पब्लिक हिरो पुरस्कार देण्यात आला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. या वेळी राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळवलेल्या रायगड संघाचा तसेच स्थानिक खेळाडूंचा ओमकार क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रफुल पाटील, गिरीश शेळके, राकेश राऊळ, अमोल नलावडे, अमित मुळूस्कर, प्रशांत राऊळ यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.


.............
फोटो ओळी : कबड्डी स्पर्धेत विजेत्या मरीआई धेरंड संघाला रोख रक्कम आणि पारितोषिक देऊन ओमकार क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रफुल पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT