मुंबई

राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी आज बेमुदत संपावर रायगड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा

CD

राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर
रायगड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा
पाली, ता. १९ (वार्ताहर) ः राज्यातील सरकारी, निमसरकारी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी एल्गार पुकारला आहे. गेल्या १५ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाने वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संपात रायगड जिल्ह्यातील सर्व कर्मचारी आणि शिक्षक पूर्ण ताकदीनिशी सहभागी होणार असल्याचे समन्वय समितीने स्पष्ट केले आहे.
गेल्या वर्षभरात सात वेळा आंदोलने करूनही शासनाने केवळ आश्वासने दिली असून, ठोस कृती केली नाही. त्यामुळे आता संपाशिवाय पर्याय उरलेला नाही, अशी भावना रायगड जिल्हा कर्मचारी शिक्षक समन्वय समितीचे निमंत्रक प्रभाकर नाईक, अध्यक्ष सुरेश पालकर आणि जिल्हा अध्यक्ष संदीप नागे यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील १७ लाख कर्मचारी एकाच वेळी संपावर गेल्याने प्रशासनासमोर मोठे पेचप्रसंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत. संपामुळे शासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता असून, शाळा आणि महाविद्यालयांतील शैक्षणिक कार्यावर परिणाम होईल. महसूल, आरोग्य आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सेवा विस्कळित होऊ शकतात. दरम्यान, शासन काही ठोस तोडगा काढणार की राज्याची प्रशासकीय यंत्रणा ठप्प होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय आहेत मागण्या?
कर्मचारी संघटनांनी एकूण १८ मागण्यांचे निवेदन शासनाला दिले आहे. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे स्पष्ट नियम जाहीर करणे आणि १ मार्च २०२४ पासून निवृत्त झालेल्यांना तात्पुरते निवृत्तिवेतन देणे. निवृत्तीचे वय इतर राज्यांप्रमाणे ६० वर्षे करणे. पदोन्नती व लाभ मिळावा. सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा (१०:२०:३०) लाभ त्वरित देणे. रिक्त असलेली ३५ टक्के पदे भरणे, तसेच चतुर्थ श्रेणी व वाहनचालक भरतीवरील बंदी उठवणे. सर्व कर्मचाऱ्यांसाठी व्यापक कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करणे. दीर्घकाळ काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेणे आदी मागण्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरे इच्छुक असतील तर पाठिंबा देणारच: आमदार रोहित पवार : एसआयआरच्या सॉफ्टवेअरमुळे मतदारांना फटका!

CSK चे टेन्शन आणखी वाढणार... आयुष म्हात्रे पुढचे सामने खेळणार की नाही? दुखापतीवर आले अपडेट

LPG Demand Drop India : देशात 'एलपीजी'ची मागणी घटली, वाढत्या दरांचा ग्राहकांवर ताण? नेमकं कारण काय...

Vaibhav Sooryavanshi: वैभवची IPLमधील वर्षपूर्ती! १५ वर्षीय फलंदाजाचे जगाला नोंद घ्यायला लावणारे १० दमदार कारनामे

आयुष म्हात्रेच्या दुखापतीबाबतीत CSK कडून निष्काळजीपणा... R Ashwin कडून कडाडून टीका

SCROLL FOR NEXT