मुंबई

रायगडकर उकाड्याने त्रस्त किनारपट्टी भागात आर्द्रतेत वाढ; अंगातून घामाच्या धारां

CD

रायगडकर उकाड्याने त्रस्त
किनारपट्टी भागात आर्द्रतेत वाढ; अंगातून घामाच्या धारा
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १९ : रायगड जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून, तापमानासोबत आर्द्रतेत झालेल्या वाढीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत रायगडमध्ये आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने उकाड्याची तीव्रता वाढली असून, घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभर उष्णतेची लाट जाणवत आहे. मात्र, राज्याच्या इतर भागांमध्ये हवामान तुलनेने कोरडे असल्याने उष्णतेचा त्रास काहीसा कमी जाणवतो. याउलट कोकण पट्ट्यात, विशेषतः रायगड जिल्ह्यात तापमान तुलनेने कमी असले तरी आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगडमध्ये बुधवारी (ता. १५) आर्द्रतेचे प्रमाण तब्बल ६१ टक्क्यांवर पोहोचले होते. मुंबईत हे प्रमाण ५३ टक्के, तर इतर काही भागांत सुमारे ५० टक्क्यांपर्यंत नोंद झाले. त्यामुळे रायगडमधील उष्णतेचा त्रास अधिक वाढला आहे. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन आणि उरण या किनारपट्टी भागांमध्ये समुद्राच्या जवळीकतेमुळे आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. परिणामी, नागरिकांना चिकट उकाड्याचा मोठा फटका बसत आहे. दिवसभर घाम येणे, अंगाला चिकटपणा जाणवणे, अस्वस्थता वाढणे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

तापमानात वाढ होण्याचा इशारा
पुढील दोन दिवस कोकण विभागात तापमानासोबत आर्द्रतेतही वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या आठवड्यात रायगडमध्ये कमाल तापमान ३१ ते ३४ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज असून, त्यात आणखी दोन ते तीन अंशांनी वाढ होऊ शकते. किमान तापमान २५ ते २७ अंश सेल्सिअसदरम्यान राहणार असून, त्यातही चार ते पाच अंशांनी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

आर्द्रतेचे प्रमाण आणि तापमान
तारीख/किमान तापमान/कमाल तापमान/आर्द्रता (टक्के)
१६ एप्रिल २५.९ ३३.२ ५० ते ८३
१७ एप्रिल २६.२ ३३.२ ४५ ते ८२
१८ एप्रिल २५.९ ३३.१ ५० ते ७९
१९ एप्रिल २७.५ ३३.९ ४३ ते ७७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT