चारा नियोजनाला प्राधान्य
एल निनोच्या पार्श्वभूमीवर पशुधन संरक्षणासाठी प्रशासन सतर्क
पाली, ता. २३ (वार्ताहर) : २०२६च्या मॉन्सूनवर एल निनोचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्यातील पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना चाराटंचाई टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना त्वरित राबवण्याचे निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत चारा नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे ठरले. राज्यात आधीच हिरव्या चाऱ्याची सुमारे ४३.९८ टक्के व सुका चाऱ्याची २५.१२ टक्के कमतरता असून, एल निनोमुळे ती वाढण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना ‘जिल्हा चारा सुरक्षा आराखडा’ तयार करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच डीपीडीसी किंवा आपत्ती निवारण निधीतून चारा बियाणे खरेदीसाठी प्राधान्याने निधी देण्याचे निर्देश आहेत. महाबीजमार्फत दर्जेदार बियाण्यांचा पुरवठा करून ५ मेपूर्वी पेरणीसाठी तयारी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
चौकट
आधुनिक उपाययोजना व नियोजन
चाराटंचाई टाळण्यासाठी धरणांच्या बॅकवॉटर परिसरात व नदीकाठावर चारा लागवडीची विशेष मोहीम राबवली जाणार आहे. तसेच मुरघास प्रकल्पांना गती देऊन दीर्घकालीन साठवणुकीवर भर दिला जाणार आहे.
चौकट
नव्या योजनांची अंमलबजावणी
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा उत्पादन, मिनी टीएमआर व कडबाकुट्टी यंत्रांचे वाटप करून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोट :
एल निनोचा काळ पशुधनासाठी आव्हानात्मक असू शकतो. त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून चारा नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.
- डॉ. किरण पाटील, आयुक्त, पशुसंवर्धन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.