मुंबई

मेंढपाळांचे कळप परतीच्या वाटेवर

CD

मेंढपाळांचे कळप परतीच्या वाटेवर
उष्णता, पाणीटंचाई आणि शिक्षणापासून वंचित पिढीचा संघर्ष
पाली, ता. २८ (वार्ताहर) : राज्यातील दुष्काळी व निमदुष्काळी भागातील मेंढपाळ, विशेषतः धनगर समाज, उपजीविकेसाठी दरवर्षी कुटुंबकबिला आणि शेळ्या-मेंढ्यांसह शेकडो किलोमीटरचा प्रवास करून कोकणात, विशेषतः रायगड जिल्ह्यात दाखल होतात. घोडे किंवा खचरांवर संसाराची बांधाबांध करून ते माळरानावर तात्पुरते तंबू ठोकून वास्तव्यास राहतात.
रायगडमध्ये भातशेती कापल्यानंतर पडीक राहिलेल्या जमिनीवर ते मुक्काम करतात. मेंढ्यांच्या लेंडीमुळे जमिनीला नैसर्गिक खत मिळत असल्याने शेतकरीही त्यांना जागा देतात. मात्र, वाढता उष्मा, पाण्याची टंचाई आणि अवकाळी पावसामुळे या मेंढपाळांचे हाल होत आहेत.
सततच्या स्थलांतरामुळे मुलांना शिक्षणापासून दूर राहावे लागते. शुद्ध पाणी, सकस अन्न आणि आरोग्यसेवा यांचा अभाव असल्याने त्यांचे जीवन अधिकच कठीण बनते. पारंपरिक पद्धतीने चालणाऱ्या या व्यवसायात विम्याचा अभाव असल्याने मेंढ्यांचे नुकसान झाले, तर मोठा आर्थिक फटका बसतो.
पावसाळा जवळ येत असल्याने आता या मेंढपाळांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे.

चौकट :
शहरीकरणाचा फास
जिल्ह्यात वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे गायरान व कृषी जमिनी कमी होत आहेत. परिणामी, चारा व पाण्याची टंचाई तीव्र झाली असून, मेंढपाळांसमोर मेंढ्या चारायच्या कुठे, हा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.

फोटो ओळ, पाली, आपल्या मेंढ्यांच्या कळपासह उन्हातान्हात भटकंती करताना मेंढपाळ. (छायाचित्र, अमित गवळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT