मुंबई

अलिबाग : रायगड जिल्ह्यात हापूस आंब्याचे उत्पादन ३० टक्क्यांनी घटले,

CD

हापूस यंदा सर्वसामान्यांना आंबट
रायगडमध्ये उत्पादनात ३० टक्क्यांनी घट; भावात मात्र २५ टक्क्यांची वाढ
अलिबाग, ता. २८ (बातमीदार) : निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका यंदा रायगड जिल्ह्यातील हापूस आंबा उत्पादनाला बसला आहे. जिल्ह्यात आंब्याचे उत्पादन तब्बल ३० टक्क्यांनी घटले असून, उत्पादनातील या तुटीमुळे बाजारपेठेत हापूसच्या भावात मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा किमतीत २५ टक्क्यांनी वाढ झाली असून, ग्राहकांना यंदा हापूससाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत.
यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच बागायतदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. हवामानातील सततचे बदल, अवेळी झालेला पाऊस आणि वाढत्या तापमानामुळे आंब्याच्या मोहोरावर व फळधारणेवर विपरीत परिणाम झाला. यामुळे झाडांना अपेक्षेप्रमाणे फळ न लागल्याने उत्पादनात मोठी घट झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
उत्पादनात घट झाल्यामुळे बाजारात हापूस आंब्याचा पुरवठा कमी झाला आहे. त्याचा थेट परिणाम किमतीवर दिसून येत असून, मागील वर्षाच्या तुलनेत हापूस आंब्याच्या भावात सुमारे २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या बाजारात दर्जानुसार आंब्यांचे भाव लक्षणीयरीत्या वाढलेले दिसत आहेत. शेतकऱ्यांना कमी उत्पादनामुळे फटका बसला असला, तरी वाढलेल्या भावामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत असल्याचेही चित्र आहे. मात्र, ग्राहकांना यंदा हापूस आंबा महागात खरेदी करावा लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, हवामानातील बदलांचा आंबा उत्पादनावर होणारा परिणाम लक्षात घेता, कृषी तज्ज्ञांकडून योग्य उपाययोजना करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला जात आहे.

हापूस आंब्याचे भाव (दोन डझन पेटी)

ग्रेड : एका आंब्याचे वजन (ग्रॅममध्ये) मागील वर्षाचे पेटी भाव चालू हंगामातील भाव
ग्रेड १ २७० ते ३०० १ हजार ३०० ते १ हजार ५०० १ हजार ५०० ते १ हजार ७००
ग्रेड २ २४० ते २७० १ हजार ते १ हजार १०० १ हजार २०० ते १ हजार ४००
ग्रेड ३ २१० ते २४० ८०० ते ९०० १ हजार ते १ हजार १००
ग्रेड ४ १८० ते २१० ६०० ते ६५० ८०० ते ८५०
ग्रेड ५ १५० ते १८० ४५० ते ५०० ६०० ते ७००


चालू हंगामात बदलत्या हवामानाचा फटका हापूस आंबा फळांना बसला. यामुळे यावर्षी ३० टक्क्यांहून अधिक उत्पादनात घट झाली. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत सध्या आंब्याला चांगला भाव मिळत असून, मागील वर्षापेक्षा सुमारे २५ टक्क्यांनी आंब्याच्या किमतीत वाढ झाली आहे.
- डॉ. संदेश पाटील, आंबा बागायतदार


फोटो ओळी : बागेतील आंबा वजनाप्रमाणे पॅकिंग करून मुंबई, पुणे, ठाणे, गुजरात बाजारपेठेत पाठविला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China Flood Latest News : चीनमध्ये मुसळधार पावसाचा कहर; 2 तासांत 200 मिमी पाऊस, Qinzhou शहरात ढगफुटीसदृश परिस्थिती

Jalgaon Temperature : तापमानाचा पारा ४४ पार; उष्माघाताचा धोका वाढला!

Latest Marathi News Live Update : उष्माघातापासून वाहनचालकांना दिलासा, उद्यापासून बदलापुरातील सर्व सिग्नल दुपारी बंद राहणार

IPL 2026 : मोठा दावा... "चेन्नई सुपर किंग्स Playoff च्या शर्यतीतून बाहेर पडल्यावरच MS Dhoni खेळणार! कदाचित तो निरोपाचा सामना"

Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार ! बंगला भाड्याने घेऊन गार्डनमध्ये सुरू केली गांजाची शेती, तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT