मुंबई

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीतही चुरस

CD

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीतही चुरस
दुपारी ३ वाजेपर्यंत ५८.५७ टक्के मतदान; आज मतमोजणी
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २८ : रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीतही यंदा चुरशीचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी स्थानिक राजकीय गटांमध्ये थेट लढती रंगल्या असून, मतदारांनीही उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात मंगळवारी (ता. २८) झालेल्या मतदानात दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी ५८.५७ टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यामुळे संध्याकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
रायगड जिल्ह्यातील एकूण १२६ ग्रामपंचायतींमधील १६७ सदस्य आणि ३० सरपंच पदांच्या रिक्त जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच यांच्या निधन, राजीनामा, अपात्रता किंवा अन्य कारणांमुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर झालेल्या या पोटनिवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिले.
निवडणुकीच्या प्रक्रियेला ७ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती. १३ एप्रिलपर्यंत अर्ज स्वीकृतीची मुदत होती. त्यानंतर छाननी प्रक्रिया पार पडली. १७ एप्रिलला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. या सर्व प्रक्रियेनंतर अनेक ठिकाणी बिनविरोध निवडी झाल्याने काही जागांवरील मतदानाची गरज उरली नाही.

संघर्षपूर्ण लढती टाळल्या
जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींची सरपंच पदे बिनविरोध झाली, तर ५५ सदस्यांचीही बिनविरोध निवड झाली. त्यामुळे उर्वरित १८ ग्रामपंचायतींमध्ये पाच सरपंच आणि ३० सदस्य पदांसाठी मतदान घेण्यात आले. थेट सरपंच पदाच्या ३० जागांपैकी ११ ठिकाणी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. त्यामुळे काही ठिकाणी सरपंच पदासाठी तडजोडीतून संघर्षपूर्ण लढती टाळण्यात आल्या.

स्थानिक आघाड्यांमुळे राजकीय चढाओढ
महाड तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींमध्ये, तर पोलादपूर, श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी मतदान झाले. याशिवाय सदस्य पदांसाठी अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती रंगल्या. काही गावांत स्थानिक आघाड्या आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी गट आमनेसामने आल्याने वातावरण तापले होते. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाने पोलिस बंदोबस्त ठेवला होता. संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष देण्यात आले. मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा दिसत होत्या. महिला व ज्येष्ठ नागरिकांचाही चांगला सहभाग नोंदविण्यात आला.

निकालाकडे सर्वांचे लक्ष्य
या पोटनिवडणुकीची मतमोजणी बुधवारी (ता. २९) होणार असून, अनेक ग्रामपंचायतींच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या निकालातून स्थानिक सत्तासमीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

तालुकावार मतदानाची टक्केवारी
अलिबाग : खंडाळे (६०.६०%), नागाव (५९.४९%), वैजाळी (५५.७६%).
मुरूड : काशिद (७९.९१% - सर्वाधिक), एकदरा (६४.३३%), मांडला (६१.३७%).
कर्जत व खालापूर : पालीतर्फे कोतल खलाटी (६३.४४%), होराळे (७४.५७%).
महाड व पोलादपूर : महालगूर (६९.०८%), ताम्हाणे (६६.४४%), मोहोप्रे (६३.९५%), तुर्भे बु. (५६.२९%), वराठी (३६.१३%).
दक्षिण रायगड : श्रीवर्धन-बागमांडला (५८.९७%), दिवेआगर (५२.२८%), रोहा-पुई (५१.६५%), माणगाव-वणीमलई कोंड (४४.४४%), म्हसळा-घोणसे (४३.५६%).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT