मुंबई

घराघरांतून दरवळतोय वाळवण संस्कृतीचा सुगंध

CD

घराघरात वाळवणाचा सुगंध
पापड, कुरडया आणि मसाल्यांची लगबग
पाली, ता. ६ (वार्ताहर) भारतीय खाद्यसंस्कृतीत चवीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पावसाळ्यातील चार-पाच महिने तोंडी लावण्यासाठी आणि जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी उन्हाळ्यात करण्यात येणाऱ्या वाळवण आणि मसाल्यांची जंत्री मोठीच आहे. रायगड जिल्ह्यात सध्या घराघरातून पापड, कुरडया, सांडगे आणि विविध मसाल्यांचा सुवास दरवळत असून, ही पारंपरिक वाळवण व खाद्य संस्कृती आजही तितक्याच उत्साहात जोपासली जात आहे.
पावसाळ्याच्या बेगमीसाठी सध्या संपूर्ण जिल्ह्यात लगबग सुरू आहे. यात प्रामुख्याने तांदळाचे पापड, गव्हाच्या चिकाच्या कुरडया, तांदळाच्या चिकोड्या, बटाटा वेफर्स, शेवया, फेण्या आणि सांडगे यांसारखे पदार्थ वैयक्तिक तसेच सामूहिकरीत्या बनवले जात आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही ही वाळवण संस्कृती केवळ खाद्यपदार्थांपुरती मर्यादित नसून, ती सामाजिक सलोख्याचे माध्यम बनली आहे. एखादीच्या घरी पापड किंवा कुरड्या करायच्या असल्यास गल्लीतील किंवा गावातील महिला विनाशुल्क आनंदाने मदतीला धावून जातात. यानिमित्ताने महिलांचे एकत्र येणे, गप्पांच्या मैफली आणि गाणी गुणगुणत चाललेले काम यामुळे श्रमपरिहार होतो.

चौकट
आंबोशी अन् सुक्या मच्छीची साठवण
कोकणची ओळख असलेल्या कोकम, आंबा व कैरीवर या दिवसांत प्रक्रिया केली जाते. घराच्या अंगणात, छतावर किंवा कौलावर कोकम तसेच कापलेल्या आंब्याच्या फोडी आंबोशी बनविण्यासाठी सुकवल्या जातात. फणस पोळी, आंबा पोळी, सांडगी मिरची आणि कोकम सरबत बनवण्यासाठी आगळ साठवण्याची कामे जोमात आहेत. तसेच पावसाळ्यात ताज्या मासळीची टंचाई भासते, म्हणून या दिवसांत सुकट, सोडे, वाकटी यासारखी सुकी मच्छी साठवून ठेवण्यावरही भर दिला जात आहे.
अशी केली जातेय तयारी
मसाले : विविध प्रकारच्या मिरच्या वाळवून घरगुती पद्धतीचे आगरी-कोळी किंवा कोकणी गरम मसाले तयार करणे.
वाळवण : तांदूळ, गहू, नाचणी आणि उडदाच्या विविध प्रकारच्या पापड्या व सांडगे.
लोणची : कैरी, लिंबू आणि करवंदाची चविष्ट लोणची भरणीत मुरत ठेवली जातात.
सरबत : कोकमचे काप करून बरणीत सरबत बनविण्यासाठी ठेवले जातात.

फोटो ओळ : पाली : पावसाळ्याच्या बेगमीसाठी पापड, कुरडया, शेवया आणि सांडगे. (छायाचित्र, अमित गवळे)

फोटो ओळ, पाली : उन्हात वाळत टाकलेल्या लाल मिरच्या व गरम मसाला. (छायाचित्र, अमित गवळे)

फोटो ओळ, पाली : पावसाळ्यासाठी सुकी मासळी खरेदी करताना (छायाचित्र, अमित गवळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय सत्तेपासून दूर राहिला तर कोण मारणार बाजी? स्टालिन फिरवू शकतात गेम, तर राज्यपालांकडे शेवटचा पर्याय

IPL 2026 Point Table: सनरायझर्स हैदराबादचा विजय अन् प्ले ऑफच्या शर्यतीत मोठी उलथापालथ; कूपर कॉनलीचे शतक व्यर्थ

llegal Mining Crackdown: धावत्या जेसीबीला लटकून ३ किमी पाठलाग; नायब तहसीलदारांची धाडसी कारवाई

विराटचा एकेकाळचा टीममेट, पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटरचं वयाच्या ३६व्या वर्षी निधन; युवराज म्हणाला, त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम...

Crime: धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून पत्नीसोबत वाजलं; रागाच्या भरात पतीनं स्वत:चं गुप्तांग कापलं, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT