मुंबई

आमणोली येथील प्रवासी पूल कोसळला

CD

आमणोली येथील प्रवासी पूल कोसळला
सुदैवाने मोठी जीवितहानी टळली
पाली, ता. १४ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील आमणोली गावाकडे जाणारा प्रवासी पूल बुधवारी (ता. १३) सायंकाळी कोसळल्याची गंभीर घटना घडली. क्षमतेपेक्षा अधिक खडी भरून जाणाऱ्या अवजड डम्परमुळे हा पूल अचानक जमीनदोस्त झाला. या अपघातात डम्परचा मागील भाग पुलाच्या ढिगाऱ्यात अडकला असून, वाहनाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घटनेच्या वेळी पुलावर अन्य वाहने किंवा पादचारी नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
हा पूल जुना व कमकुवत असल्याची माहिती ग्रामस्थांनी यापूर्वीच प्रशासनाला दिली होती. मात्र, वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक नियमितपणे होत होती, जे नियमबाह्य होते.
घटनेची माहिती मिळताच पाली पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक हेमलता शेरेकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत अन्य पोलिस कर्मचारीही उपस्थित होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
पूल कोसळल्यामुळे आमणोली गावाचा संपर्क तुटण्याची शक्यता असून, अत्यावश्यक सेवांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चौकट
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच अपघात
ग्रामस्थांच्या मते, पुलाची क्षमता कमी असतानाही अवजड वाहनांना प्रवेश देणे ही गंभीर निष्काळजी आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने हा अपघात घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. संबंधित डम्परमालक, कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut song on Sachin Ahir :'जे कधीच नव्हते आमचे त्याची वाट का पहावी?', संजय राऊतांची सचिन अहिरांवर गाण्यातून टीका

IND vs ENG : तो परतला... भारतीय संघाची ताकद वाढली, इंग्लंडची भलतीच कोंडी झाली! पहिल्याच सराव सत्रात नेमकं काय घडलं?

1,30,00,00,000 रुपयांचा मालक, तरीही सनी देओलच्या पायात फाटके बूट; Video Viral

Latest Marathi News Live Update : 'गोकूळ'साठी आघाडीचं आज शक्तिप्रदर्शन

Crime: फ्री मोमोजच्या बहाण्याने तरुणींना जाळ्यात ओढलं; नंतर धार्मिक स्थळी अश्लील व्हिडिओ बनवले अन्... रेहानचे भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT