Sanjay Raut song on Sachin Ahir :'जे कधीच नव्हते आमचे त्याची वाट का पहावी?', संजय राऊतांची सचिन अहिरांवर गाण्यातून टीका

Sanjay Raut reaction : सचिन अहिर यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशानंतर संजय राऊत यांनी कवितेच्या माध्यमातून टीका केली. 'जे कधीच नव्हते आमचे त्याची वाट का पहावी?' या ओळींमुळे राजकीय चर्चांना उधाण आले.
Sanjay Raut song on Sachin Ahir

Sanjay Raut song on Sachin Ahir

esakal

Updated on

Sanjay Raut on Sachin Ahir : शिवसेना (ठाकरे गट) सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. या घडामोडीनंतर ठाकरे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, खासदार संजय राऊत यांनी कवी सुरेश भट यांच्या कवितेतील ओळी शेअर करत अहिर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. तर, आदित्य ठाकरे यांनीही अहिर यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत पक्षाकडून योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com