निरोगी आरोग्यासाठी योगसाधनेची गरज
पाच्छापूर माध्यमिक विद्यालयात योग दिन उत्साहात
पाली, ता. २२ (वार्ताहर) माध्यमिक विद्यालय पाच्छापूर येथे ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि सर्वांगीण विकासासाठी योगचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दीपक माळी हे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून योग अभ्यासिका व शिक्षिका दिव्या जंगम उपस्थित होत्या. मुख्याध्यापक दीपक माळी यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य आणि श्रेष्ठ देणगी आहे. आजच्या दगदगीच्या आणि गतिमान युगात निरोगी व आनंदी जीवनाचा प्रवास करायचा असेल, तर योग ही काळाची गरज आहे.
मार्गदर्शक दिव्या जंगम यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचे थेट प्रात्यक्षिक करून दाखवले. केवळ प्रात्यक्षिके न दाखवता त्यांनी प्रत्येक आसनाचे शरीराला होणारे फायदेही सोप्या भाषेत समजावून सांगितले.
फोटो ओळ, पाली, पाच्छापूर विद्यालयात सामूहिक योगासने करताना विद्यार्थी, मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.