मुंबई

आले वलगणीचे दिवस जिल्ह्यात पावसाची एन्ट्री वलगनीचे मासे पकडण्यासाठी नदी-नाल्यांवर झुंबड

CD

वलगणीचे मासे पकडण्यासाठी नदी-नाल्यांवर झुंबड
पाली, ता. २४ (वार्ताहर) ः गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. यामुळे बळीराजा सुखावला असतानाच, दुसरीकडे खवय्यांसाठीही आनंदाची बातमी आली आहे. नदी-नाल्यांना नवीन पाणी आल्यामुळे ग्रामीण भागात वलगणीचे मासे पकडण्याची लगबग सुरू झाली आहे.
जूनच्या सुरुवातीपासून समुद्रातील मासेमारी बंद झाल्यामुळे खवय्यांचे डोळे गोड्या पाण्यातील मासळीकडे लागले होते. पावसाच्या आगमनाने बाजारात आणि नदी-नाल्यांच्या काठावर शेतात गोड्या पाण्यातील माशांची मोठी मेजवानी सुरू झाली आहे. सध्या चिवण्या, मळे, शिवडा, कटला, अरलय, वाम, कोलंबी, खवल आणि म्हूऱ्या यांसारखे मासे सापडत आहेत. स्थानिक लोक रात्री-अपरात्री आणि पहाटेच्या वेळी हे मासे पकडत आहेत. या माशांच्या विक्रीतून त्यांना उपजिविकेस आर्थिक हातभार लागत आहे.

बाजारात मोठी मागणी
आम्ही अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहत होतो. पाऊस सुरू होताच नदीला पाणी आले असून, वलगणीचे मासे खाली उतरले आहेत. आम्ही जाळे आणि पाग घेऊन रात्रीचे मासे पकडत आहोत. सध्या मिळणाऱ्या बहुतांश माशांमध्ये गाबोळी असल्याने खवय्यांकडून मोठी मागणी आहे, असे मासेमार जितेश तांडेल यांनी सांगितले.

काय असते वलगण किंवा उधवण?
पाऊस पडल्यानंतर नदी आणि खाडीतील पाणी वाढते. अशा वेळी मासे प्रजननासाठी (अंडी देण्यासाठी) नदीच्या प्रवाहाविरुद्ध पोहत शेतातील किंवा नदीकाठच्या कमी पाण्यात येतात. या प्रक्रियेला स्थानिक भाषेत वलगण किंवा उधवण म्हणतात. हे मासे चवीला अतिशय उत्कृष्ट असतात आणि त्यांच्या पोटात अंडी (गाबोळी किंवा पेर) सापडतात. हे वलगणीचे मासे पकडण्यासाठी सध्या गावागावांत अबालवृद्धांची झुंबड उडत आहे.

फोटो ओळ :
पाली ः परिसरातील नदीकाठावर वलगणीचे मासे पकडताना स्थानिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

IND vs ENG, T20I: एकट्या वैभव सूर्यवंशीसाठी इंग्लंडमध्ये वेगळी ड्रेसिंग रुम असणार! पण नेमकं यामागे खरं कारण काय?

Latest Marathi News Live Update : शेती उपसा सिंचन योजनेसाठी वीज कनेक्शन मिळावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांचे उपोषण

निळावंतीचं रहस्य आणि गुप्त खजिन्याचा शोध! ब्रिटिशकालीन इतिहासावर आधारित 'इंद्रजाल'चा थरारक फर्स्ट लुक आउट

Solapur Water Rights: दुष्काळी १३ तालुक्यांसाठी ३४ वी पाणी संघर्ष परिषद २६ जूनला मंगळवेढ्यात

SCROLL FOR NEXT