मुंबई

पावसाने रोखला गणेशभक्तांचा मार्ग

CD

पावसाने रोखला गणेशभक्तांचा मार्ग
शनिवारच्या रात्रीत सहा हजार वाहनांचा कोकण प्रवास
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १३ : गणेशोत्सवासाठी कोकणात शनिवारी काम संपवून रात्री उशिरा निघालेल्या गणेशभक्तांचा मार्ग मुसळधार पावसाने रोखून धरला. ठाणे येथून माणगावपर्यंत पोहोचण्यासाठी आठ तासांपेक्षा जास्त कालावधी लागला. रात्रीच्या मुसळधार पावसात नागोठणे, इंदापूर, माणगाव येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांच्या अंदाजानुसार शनिवारी रात्री सहा हजार लहान-मोठी वाहने कोलाड नाका येथून तळकोकणात प्रवास करीत होती. यात दुचाकीचालकांचे प्रमाण ३० टक्क्यांहून अधिक होते. सकाळी ७ वाजल्यानंतर पावसाने थोडीशी उसंत घेतली असल्याने येथील कोंडी काही प्रमाणात कमी झाली.
रविवारी सुट्टीच्या दिवशी गणेशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने कोकणवासीय निघाले आहेत. रविवारी दिवसभर सर्वाधिक रहदारी असेल, असा अंदाज वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक सचिन पवार यांनी व्यक्त केला. या रहदारीला पावसाने व्यत्यय आणल्याने वाहनाच्या लांबच लाब रांगा लागल्या. ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक शाखा, महामार्ग पोलिस भरपावसात काम करीत आहेत. मुंबई, ठाणे परिसरातून मोठ्या संख्येने गणेशभक्त कोकणच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला. माणगाव आणि इंदापूर येथील अपूर्ण बाह्यवळण रस्ते, अरुंद बाजारपेठेतील रस्ता आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडीत भर पडली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहनांना बंदी असतानाही काही ट्रक आणि केमिकल टँकर रस्त्यावर दिसून आले. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर झाली.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. इंदापूर आणि माणगाव येथील बाह्यवळण रस्त्यांची कामेही अपूर्ण आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील अरुंद रस्त्यावरून दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू आहे. या कारणामुळे वाहतुकीचा वेग मंदावत असल्याचे पाहायला मिळाले.
---
महामार्गावर वाहनांना थांबण्यास मनाई
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर तसेच खोपोली-वाकण मार्गावर अवजड वाहनांना थांबण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबतची वाहतूक अधिसूचना रायगडच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी जारी केली आहे. वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. माणगाव रेड्डीज हॉटेल ते ढालघर फाटा, निजामपूर नाका ते कालवा रोज, मोर्बा नाका ते पवार वाडा, इंदापूर माही हॉटेल ते कशेणे बायपासदरम्यान अवजड तसेच हलक्या वाहनांना थांबण्यास तसेच वाहने पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे; तरीही अनेक मालवाहतूक करणारे ट्रक, केमिकल टँकर्स मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले. या वाहनांचे नियमन करण्यात वाहतूक पोलिसांना अपयश आल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिकच बिकट झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

आगमन मिरवणुकीत पुन्हा अपघात! ट्रॉली उलटल्याने गणेशमूर्ती कोसळली; अंगावर शहारा येणारा Video Viral

BRICS Summit 2026 : एकाच शक्तीचं कायम वर्चस्व शक्य नाही’; BRICS मध्ये जिनपिंग यांची अमेरिकेवर टीका, पंतप्रधान मोदींचे मानले आभार

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Ganeshotsav Security : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ व शेटफळमध्ये पोलिसांचे पथसंचलन; गुन्हेगारांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT