मुंबई

श्री सिद्धलक्ष्मी गणेश जांभूळपाडा येथील प्राचीन गणेश मंदिर

CD

जांभूळपाड्यातील श्री सिद्धलक्ष्मी गणेश
सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा येथील श्री सिद्धलक्ष्मी गणेश मंदिर शेकडो वर्षांपूर्वीचे असून, प्राचीन धार्मिक परंपरेचा वारसा जपणारे हे स्थान आहे. अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीपासून १६ किलोमीटर अंतरावर पाली-खोपोली राज्य महामार्गालगत हे मंदिर आहे. भोर संस्थानातर्फे मंदिराची मूळ मालकी खरे (दीक्षित) कुटुंबीयांना देण्यात आली होती. जांभूळपाड्यातील या प्राचीन गणेश मंदिराची माहिती तुलनेने कमी भाविकांना आहे. स्थानिक नागरिक मात्र या गणेशाचे महात्म्य मानून नियमितपणे दर्शन घेतात.

१९३९ मध्ये काही कारणाने मूर्ती भंग पावली. त्यानंतर वेदमूर्ती गोविंदराव धारप आणि अन्य शास्त्री यांच्या हस्ते नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. भव्य स्वरूपाची ही गणेशमूर्ती शिल्पकामामुळे लक्ष वेधून घेते. मूर्तीवर कालांतराने शेंदूराचे अनेक थर जमा झाले होते. मध्यंतरी हे थर काढण्यात आल्यानंतर मूर्तीचे मनोहर रूप स्पष्ट झाले. या गणेशाचे प्रतिष्ठापक कोण होते, याबाबत मात्र ठोस माहिती उपलब्ध नाही. मंदिराचे प्राचीनत्व आणि मूर्तीचे वैशिष्ट्य यामुळे हे देवस्थान परिसरातील श्रद्धास्थान मानले जाते.

सिद्धलक्ष्मी गणेशाच्या स्वरूपाला गणेश उपासनेतील विविध ध्यानपरंपरांचा संदर्भ आहे. हेरंब, उच्छिष्ट आणि वल्लभ या गणेशाच्या ध्यानांमध्ये दशभुज स्वरूपाचा उल्लेख आढळतो. महागणपतीच्या ध्यानातही दशभुज गणपतीचे वर्णन आहे. या स्वरूपातील चार हात गणपतीचे, तर उर्वरित सहा हात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जातात. हेदवी येथील प्रसिद्ध गणपतीही दशभुज सिद्धलक्ष्मी गणेश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जांभूळपाड्यातील श्री सिद्धलक्ष्मी गणेश मंदिराला धार्मिक परंपरेत विशेष स्थान लाभले आहे.


फोटो ओळ, पाली, श्री सिद्धलक्ष्मी गणेश
फोटो ओळ, पाली, श्री सिद्धलक्ष्मी गणेश मंदिर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : माझ्या चारित्र्यहननाचा प्रयत्न- आदित्य ठाकरे

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT