मुंबई

गणरायाच्या साक्षीने राज्यप्रतीकांचा जागर

CD

गणरायाच्या साक्षीने राज्य प्रतीकांचा जागर
जैवविविधता संवर्धनाचा संदेश देणारा पर्यावरणपूरक देखावा
पाली, ता. १५ (वार्ताहर) : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पालीतील अंबिके कुटुंबीयांनी यंदाही पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव साकारला आहे. यंदाच्या सजावटीची संकल्पना ‘राज्य प्रतीकांचा जागर, जैवविविधतेचा संकल्प’ अशी असून, महाराष्ट्राच्या राज्य प्रतीकांची माहिती आणि त्यांच्या संवर्धनाचा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे.
शाडू मातीची गणेशमूर्ती साकारून त्यासोबत राज्य वृक्ष, राज्य फूल, राज्य प्राणी, राज्य पक्षी, राज्य माता, राज्य शस्त्र आणि राजभाषा इत्यादी राज्य प्रतीकांची माहितीपूर्ण मांडणी करण्यात आली आहे. प्रत्येक प्रतीकाचे वैशिष्ट्य, मान्यता मिळाल्याचे वर्ष आणि पर्यावरणीय महत्त्व माहितीफलकांद्वारे सांगण्यात आले आहे.
कागद, पुठ्ठा, दोरा, रंग तसेच टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून हा देखावा तयार करण्यात आला आहे. पाणी, फुले आणि हिरवाईच्या मांडणीमुळे देखाव्याला आकर्षक स्वरूप आले आहे. ‘निसर्ग जपा, जैवविविधता जपा आणि महाराष्ट्राचा वारसा जपा’ असा संदेशही देण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांना महाराष्ट्राच्या नैसर्गिक व सांस्कृतिक वारशाची माहिती देणे हा असल्याचे आयडॉल शिक्षक राजेंद्र अंबिके यांनी सांगितले.

क्यूआर कोडमधून माहिती
देखाव्यातील प्रत्येक राज्य प्रतीकाशी संबंधित अधिक माहिती क्यूआर कोडच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित प्रतीकाची सविस्तर माहिती डिजिटल स्वरूपात पाहता येते. तसेच संपूर्ण देखाव्याला ऑडिओ निवेदनाची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे भेट देणाऱ्यांना राज्य प्रतीकांची माहिती पाहण्यासोबतच ऐकूनही घेता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT