मुंबई

''पुढच्या वर्षी लवकर या''च्या जयघोषात दीड दिवसांच्या गणरायाला निरोप पाली आणि सुधागड तालुक्यात भावपूर्ण वातावरणात विसर्जन पोलीस प्रशासन व नगरपंचायतीचे चोख नियोजन

CD

पुढच्या वर्षी लवकर या
दीड दिवसांच्या गणरायाला निरोप
पाली, ता. १५ (वार्ताहर) ः ‘पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष, पारंपरिक ढोल-ताशांचा गजर आणि जड अंतःकरणाने दीड दिवसाच्या गणरायाला मंगळवारी (ता. १५) पाली शहरासह संपूर्ण सुधागड तालुक्यात भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. आरती, पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे दीड दिवस हा भाग मंगलमय झाला होता.
विसर्जनाच्या दिवशी पाली येथील अंबा नदी घाटावर शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. संपूर्ण विसर्जन सोहळा शांततेत आणि शिस्तीत पार पडण्यासाठी पोलिस प्रशासन आणि पाली नगरपंचायतीच्या वतीने चोख व्यवस्थापन करण्यात आले होते. पोलिस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रमुख चौक, विसर्जन घाट आणि संवेदनशील ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. वाहतूक नियंत्रण आणि शांतता राखण्यासाठी महिला पोलिस, वाहतूक शाखा व स्थानिक स्वयंसेवकांनी प्रभावी समन्वय साधला.

देवस्थान व नगर पंचायतीचे विशेष उपक्रम
 श्री बल्लाळेश्वर देवस्थान आणि पाली नगर पंचायतीच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम राबवण्यात आले.  घाटावर निर्माल्य संकलनासाठी विशेष कलश ठेवण्यात आले होते. नगर पंचायतीचे नगरसेवक, कर्मचारी आणि स्थानिक स्वयंसेवकांनी विसर्जन सुरळीत होण्यासाठी मोलाचे योगदान दिले.


फोटो ओळ,
पाली ः दीड दिवसाच्या गणरायाला विसर्जनासाठी घेऊन जाताना नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT