मुंबई

सुधागडातील प्राचीन लेण्यांचा अमूल्य ठेवा समृद्ध इतिहासाचा आणि स्थापत्यकलेचा अनोखा संगम

CD

सुधागडच्या लेण्यांत इतिहासाचे वैभव
बौद्धकालीन स्थापत्य, शिल्पकलेचा अनमोल ठेवा

पाली, ता. ५ (वार्ताहर) : प्राचीन आणि भव्य लेण्यांच्या अमूल्य ठेव्याने सुधागड तालुका समृद्ध झाला आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या ठाणाळे, नेणवली, गोमाशी आणि चांभार लेणी समूहातून भारतीय संस्कृती, बौद्धकालीन इतिहास आणि प्राचीन शिल्पकलेचा समृद्ध वारसा आजही अनुभवता येतो. त्यामुळे इतिहासप्रेमी, बौद्ध अभ्यासक आणि निसर्गप्रेमींसाठी हा परिसर आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.
चौल बंदरातून नागोठणेमार्गे देशावर जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गावर हा लेणी समूह विकसित झाला. ठाणाळे लेण्यांना तब्बल २,२०० वर्षांची परंपरा असून, इ. स. पूर्व दुसऱ्या शतकापासून इ. स. पाचव्या शतकापर्यंतचा इतिहास त्याला लाभला आहे. येथे चैत्यगृह, स्तूप, सभागृह आणि २१ विहार आहेत. बेसॉल्ट दगडात कोरलेल्या या लेण्यांमध्ये वाकाटककालीन रंगीत चित्रांचे अवशेष, प्राकृत-ब्राह्मी लिपीतील शिलालेख आणि पाण्याची टाकी पाहायला मिळते. कोकणातून घाटमाथ्याकडे जाणाऱ्या भिक्षू आणि व्यापाऱ्यांसाठी हा परिसर महत्त्वाचे विश्रांतीस्थान होते. क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनीही चिवरदांड जंगलातील या लेण्यांमध्ये आश्रय घेतल्याचे सांगितले जाते.
खडसांबळे व नेणवली गावांजवळील लेणी समूहात २१ लेणी आहेत. त्यातील २१ बाय १६ मीटरचे विशाल सभागृह महाराष्ट्रातील मोठ्या प्राचीन सभागृहांपैकी एक मानले जाते. जवळच चांभार लेणी असून, गोमाशीच्या डोंगरातील घळीत भगवान बुद्धांची सुमारे दीड मीटर उंचीची आकर्षक प्रतिमा कोरलेली आहे.

चौकट
ठाणाळे लेण्यांचा वारसा
२,२०० वर्षे जुना बेसॉल्ट खडकातील लेणी समूह
मोर्यकालीन चांदीची नाणी सापडल्याचा उल्लेख
वाकाटककालीन चित्रांचे दुर्मिळ अवशेष
प्राकृत-ब्राह्मी शिलालेख आणि पाण्याची टाकी

चौकट
नेणवली-गोमाशीचे वैशिष्ट्य
नेणवलीतील २१ x १६ मीटरचे भव्य सभागृह
सभागृहात १७ खोल्या आणि दगडी ओटे
मागील बाजूस कोरलेला घुमट
गोमाशी येथे बुद्धांची आकर्षक शिल्पप्रतिमा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gangapur News : अवैध दारू विक्री वाढल्याने वरखेड गावात महिला व ग्रामस्थांनी काढला गांधीगिरी मोर्चा; दारू विक्रीविरोधात ग्रामसभेत ठराव मंजूर

Nilanga News : मदतीसाठी कागदपत्रांचा ससेमिरा! गावाचा एकच पंचनामा करून सरसकट मदत द्या; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

Latest Marathi News Live Update : शिक्षक भरतीत लाखोंची फसवणूक, अपूर्व हिरेंसह पाच जणांवर गुन्हा

Pune News : उजनीतील खासगी मासेमारी ठेका प्रक्रिया रद्द; जलसंपदा विभागाच्या बैठकीत निर्णय

Baramati Crime : शेरेवाडी दुहेरी खूनाचा गुन्हा उघड....; नातलगानेच केला दुहेरी खून....

SCROLL FOR NEXT