मुंबई

वऱ्हाड जांभूळपाडा ग्रामपंचायत कार्यालयात सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांसाठी जागा उपलब्ध शेतकऱ्यांना थेट मार्गदर्शन मिळण्याचा मार्ग मोकळा

CD

शेतकऱ्यांसाठी कृषी अधिकारी गावातच
पाली, ता. ६ (वार्ताहर) : ग्रुप ग्रामपंचायत वऱ्हाड-जांभूळपाडा कार्यालयात सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना नियमित बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना कृषी योजना, अनुदान आणि अर्ज प्रक्रियेबाबत आता गावातच मार्गदर्शन मिळणार आहे.
सुधागड वैभव फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीचे संचालक दत्तात्रय दळवी यांनी नुकतेच ग्रामपंचायतीकडे पत्र देऊन सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांसाठी ठरावीक दिवशी व वेळेत बसण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. शासनाच्या विविध कृषी योजना व अनुदानाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी अधिकारी गावात येत असले, तरी बैठकीची योग्य व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांशी नियमित संपर्क साधण्यात अडचणी येत होत्या. परिणामी अनेक शेतकरी सरकारी योजनांच्या माहितीपासून वंचित राहत होते.
या मागणीची दखल घेत ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत या विषयावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना नियमित बसण्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी दूरवर जाण्याची गरज कमी होणार असून, कृषी विभागाशी थेट संपर्क साधणे सुलभ होणार आहे. या निर्णयाचे सुधागड वैभव फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीसह परिसरातील शेतकरीवर्गाने स्वागत केले आहे.

चौकट
शेतकऱ्यांना थेट फायदा
कृषी योजना व अनुदानाची माहिती गावातच मिळणार
अर्ज व आवश्यक कागदपत्रांबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन
शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत
कृषी विभागाशी थेट संपर्काची सुविधा उपलब्ध

फोटो ओळ, पाली : वऱ्हाड जांभूळपाडा ग्रामपंचायत कार्यालयात सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांसाठी जागा उपलब्ध असल्याचे पत्र दत्तात्रय दळवी यांनी दिले. (छायाचित्र, अमित गवळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satana News : दुष्काळ जाहीर; मात्र शेतकरी डिजिटल चक्रव्यूहात, सातबारा अन् ‘फार्मर आयडी’साठी संकेतस्थळे ठप्प

SME Growth Fund : लघु आणि मध्यम उद्योगांसाठी १० हजार कोटींचा 'एसएमई ग्रोथ फंड'; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Marathi News Live Updates: पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’चा अहवाल

Sanchar Saathi Milestone : सायबर फसवणुकीविरोधात नागरिक बनले ‘योद्धा’! ‘संचार साथी’ पोर्टलने ओलांडला ३० कोटी भेटींचा टप्पा

Mumbai Police: 2 हजार 850 बनावट अ‍ॅप्स अन् 9 हजार 673 नागरिकांची 150 कोटींची फसवणूक; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

SCROLL FOR NEXT