मुंबई-गोवा महामार्गावरील दुभाजक झाडीने व्यापले
अपघाताचा धोका; वाहनचालकांची झाडी हटविण्याची मागणी
पाली, ता. ७ (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गावरील दुभाजकांवर मोठ्या प्रमाणात गवत, झुडपे आणि झाडी वाढल्याने वाहनचालकांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यानंतर वाढलेल्या या झाडीची वेळेत छाटणी न झाल्याने अनेक ठिकाणी ती उंच वाढली आहे. त्यामुळे दुभाजकाच्या पलीकडून येणारी वाहने तसेच वळणावरून समोर येणारी वाहने वेळेत दिसत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी आणि तीव्र वळणांवर झाडीमुळे रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. अचानक रस्ता ओलांडणारे नागरिक किंवा प्राणीही वेळेत न दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने महामार्गावरील दुभाजकांवरील गवत व झाडी तातडीने हटवून प्रवास सुरक्षित करावा, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
कोट :
काही दिवसांपूर्वी ड्राइव्ह घेऊन महामार्गाची पाहणी केली आहे. पाऊस थांबल्यानंतर गवत व झाडी काढून साफसफाई करण्यात येणार होती. आता पाऊस थांबल्याने हे काम सुरू केले असून, लवकरच पूर्ण करण्यात येईल.
— रवींद्र इंगोळे, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)
फोटो ओळ, पाली, मुंबई गोवा महामार्गावर दुभाजकांवर वाढलेले गवत व झाडी. (छायाचित्र, अमित गवळे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.