नियोजन बैठकीचा अखेर मुहूर्त
प्रलंबित प्रकल्पांसाठी निधीवाटपाकडे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ९ : तब्बल पावणेदोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीची तारीख निश्चित झाली आहे. सोमवारी (ता. १९) पालकमंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. त्यामुळे रखडलेल्या विकासकामांचे नियोजन, निधीवाटप आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
विविध कारणांमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बैठक पुढे ढकलली जात होती. पितृपंधरवड्यामुळेही बैठक होऊ शकली नाही. पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही पहिलीच बैठक असल्याने तिच्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
महायुतीतील अंतर्गत मतभेदांमुळे रायगडचे पालकमंत्रिपद जवळपास पावणेदोन वर्षे रिक्त होते. शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्षामुळे नियुक्तीचा प्रश्न लांबणीवर पडला होता. विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटाने माघार घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पालकमंत्री पदावरील दावा सोडला आणि भरत गोगावले यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली.
समितीच्या गठनाचे आव्हान
पालकमंत्र्यांची नियुक्ती होऊन जवळपास दोन महिने उलटले, तरी जिल्हा नियोजन समितीचे गठन अद्याप झालेले नाही. त्यामुळे १९ तारखेच्या बैठकीत विकासकामांच्या आराखड्यासह निधीवाटप आणि समितीच्या गठनाबाबत कोणते निर्णय होतात, याबाबत उत्सुकता आहे. या बैठकीतून जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना गती मिळणार का, हे स्पष्ट होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.