मुंबई

आदिवासींच्या फुलांना नवरात्रात मागणी

CD

आदिवासींच्या फुलांना नवरात्रात मागणी
अवघ्या १० ते २० रुपयांत रंगीबेरंगी जुडी; महिला विक्रेत्यांना रोजगाराची संधी
पाली, ता. ११ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील आदिवासी वाड्या-पाड्यांवर परसबागेत आणि रानमाळावर फुलवलेल्या अस्टर व झेंडूच्या फुलांना नवरात्रोत्सवात मोठी मागणी आहे. अवघ्या १० ते २० रुपयांत मिळणाऱ्या ताज्या फुलांमुळे ग्राहकांना स्वस्त दरात पूजेसाठी फुले उपलब्ध होत असून, आदिवासी महिला व पुरुषांना रोजगाराची संधी मिळाली आहे.
जिल्ह्यात पुणे आणि वाशी येथील मंडईतूनही झेंडूची फुले विक्रीसाठी येतात, मात्र स्थानिक आदिवासींनी पिकवलेल्या फुलांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आदिवासी महिला व पुरुष टोपल्यांमध्ये फुले भरून घरोघरी आणि बाजारात विक्री करतात. पहाटेपासून मेहनत घेऊन ते ताजी फुले ग्राहकांपर्यंत पोहोचवतात.
अस्टरच्या एका जुडीत १० रंगीबेरंगी फुले, तर झेंडूच्या जुडीत १० पेक्षा अधिक मोठी फुले मिळतात. घटस्थापना, देवीची आरास, मखर सजावट आणि सार्वजनिक मंडळांच्या सजावटीसाठी या फुलांचा वापर होत आहे.

सणासुदीत विक्रीत वाढ
चेरफळवाडी येथील फुलविक्रेते रघुनाथ शिद यांनी सांगितले की, यंदा पाऊस कमी असूनही फुलांचे उत्पादन चांगले आहे. नवरात्र आणि दिवाळीत विक्री वाढते. जास्त खरेदी केल्यास पन्नास रुपयांत सहा ते सात जुड्या दिल्या जातात; मात्र १० रुपयांत दोन जुड्या देणे परवडत नसल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक फुलविक्रीमुळे आदिवासी कुटुंबांना आर्थिक हातभार लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Savitribai Phule Pune University: सावित्रीबाई फुले विद्यापीठाची संलग्नता नाही, नोंदणीकृत पत्त्यावर कॉलेजही नाही; पुण्यातील प्रकार उघड

SCROLL FOR NEXT