मुंबई

तीच दुर्गा, तीच प्रेरणा स्वतःच्या कष्टाने ''आगरी लस्सी'' ब्रँड उभा करणाऱ्या अनिता म्हात्रे!

CD

जिद्दीतून घडवली स्वतःची ओळख
ग्रामीण महिलांसमोर अनिता म्हात्रे यांचा आदर्श
पाली, ता. १४ (वार्ताहर) : स्त्रीमध्ये जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास असेल, तर ती कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करू शकते. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील आमटेम गावच्या अनिता म्हात्रे यांनी आपल्या कर्तृत्वातून हे सिद्ध केले आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत स्वतःच्या मेहनतीने व्यवसाय उभा करणाऱ्या अनिता आज ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरल्या आहेत.
सहा वर्षांपूर्वी अनिता यांनी म्हात्रे डेअरी सुरू केली. काहीतरी वेगळे करण्याची इच्छा आणि स्वतःच्या कौशल्यावर असलेला विश्वास यांतून त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली. मुलगा मितेश याच्या सहकार्याने त्यांनी ‘आगरी लस्सी’ची ओळख निर्माण केली. मुंबई-गोवा महामार्गावरील त्यांचे दुकान आज प्रवाशांसह अनेक ग्राहकांचे आकर्षण ठरले आहे.
उन्हाळा, गणेशोत्सव आणि ऑक्टोबरमधील उकाड्याच्या काळात त्यांच्या दुकानात ग्राहकांची विशेष गर्दी असते. स्वच्छता, चांगली सेवा आणि ग्राहकांशी आपुलकीने वागण्यावर त्यांनी भर दिला आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवर, कलाकार आणि लोकप्रतिनिधीही त्यांच्या दुकानाला भेट देतात.

महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण
ग्रामीण भागातील अनेक महिलांकडे कौशल्य असते; मात्र संधीअभावी त्यांना स्वतःची क्षमता दाखवता येत नाही. अनिता यांनी मेहनत, सातत्य आणि कौटुंबिक सहकार्याच्या बळावर स्वतःची वाट निर्माण केली. त्यांचा प्रवास महिलांना स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाण्याची प्रेरणा देतो. स्त्री केवळ घराची जबाबदारी सांभाळत नाही, तर आपल्या कर्तृत्वाने कुटुंबाला आणि समाजालाही नवी दिशा देऊ शकते.

फोटो ओळ, पाली, आगरी लस्सी ब्रँड निर्माण करणाऱ्या अनिता म्हात्रे. (छायाचित्र, अमित गवळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

W,W,W,W,W ! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाचा कहर, ट्वेंटी-२०त एकाच षटकात सलग पाच विकेट्स VIDEO

Pune News : कामकाजात दुर्लक्ष भोवले; आरोग्‍य विभागाच्‍या दोन सहाय्यक संचालकांचे निलंबन

Maharashtra Live News : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात महत्त्वाची बैठक

Sugarcane Rate Agitation : ऊसदराच्या आंदोलनामुळे कोगनोळी टोलनाक्यावरील वाहतूक ठप्प; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

'या गोजिरवाण्या घरात' मधली दीक्षा आठवते? सध्या काय करते? सांगितलं छोट्या पडद्यावर न दिसण्याचं कारण

SCROLL FOR NEXT