उत्सवात नियमपालनाचे आवाहन
पेडलीत अवैध मद्यविक्री, महिला सुरक्षेचा प्रश्न
पाली, ता. १३ (वार्ताहर) : नवरात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सुधागड तालुक्यातील सार्वजनिक मंडळांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले. पाली पोलिस ठाण्यात आयोजित बैठकीत पेडली परिसरातील अवैध मद्यविक्री, अंबा नदीपात्रातील प्रदूषण आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.
उपविभागीय पोलिस अधिकारी प्रसाद गोकुळे आणि पोलिस निरीक्षक उत्तम रिकामे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली. उत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार डीजे वाद्यांवरील बंदीचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. वाहतुकीचे नियम पाळावेत, सार्वजनिक ठिकाणी शिस्त राखावी आणि नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.
दरम्यान, पेडली परिसरातील काही बिअर शॉपींमध्ये तसेच आवढे रस्त्यावरील बिअर शॉपीजवळ नियम डावलून विदेशी मद्याची विक्री होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. मद्यधुंद व्यक्तींकडून रस्त्यावर आणि अंबा नदीच्या पात्रात काचेच्या बाटल्या फोडल्या जात असून, प्लॅस्टिक कचरा टाकला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या महिला आणि शाळकरी मुलींना मद्यपींच्या हुल्लडबाजीचा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार करण्यात आली.
अवैध विक्रीवर कारवाईची मागणी
नागरिकांनी मांडलेल्या समस्यांची पोलिसांनी दखल घेतली. अवैध मद्यविक्री आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून महिला, विद्यार्थिनी आणि स्थानिक नागरिकांना दिलासा देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
या बैठकीला सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक धाबे, विविध नवरात्रोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.