मुंबई

फराळ व्यवसायाला महागाईचा फटका

CD

फराळ व्यवसायाला महागाईचा फटका
गृहउद्योजिकांचे आर्थिक गणित बिघडले; ग्राहक टिकवण्याचेही आव्हान
पाली, ता. १ (वार्ताहर) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घराघरांत फराळ बनवण्याची लगबग सुरू झाली असतानाच वाढत्या महागाईने गृहउद्योजिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. तेल, डाळी, साखर, गॅस आणि पॅकिंग साहित्याच्या वाढलेल्या किमतींमुळे उत्पादन खर्चात मोठी भर पडत आहे. ग्राहकांना दर्जेदार फराळ रास्त भावात देताना नफा टिकवायचा कसा, असा प्रश्न महिला उद्योजिकांसमोर निर्माण झाला आहे.
चकली, लाडू, शेव आणि चिवडा यांसारख्या पारंपरिक पदार्थांच्या निर्मितीत तेल आणि डाळींचा खर्च मोठा असतो. एकूण उत्पादन खर्चापैकी अंदाजे ६० टक्के खर्च या दोन घटकांवर होतो. मोठ्या व्यावसायिकांना घाऊक खरेदीतून काही प्रमाणात आर्थिक फायदा मिळतो, मात्र मर्यादित भांडवलामुळे घरगुती उत्पादकांना तो लाभ मिळत नाही. कच्चा माल, इंधन, पॅकिंग आणि मजुरी यांचा खर्च वाढल्याने नफ्याचे प्रमाण घटले आहे.
गृहउद्योजिका प्राची साठे-गोळे म्हणाल्या, ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेऊन आम्ही पाम तेलाऐवजी शुद्ध रिफाइंड तेल आणि दर्जेदार साहित्य वापरतो, मात्र महागाई आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किमतींमुळे उत्पादन खर्च वाढला आहे. ग्राहक टिकवणे आणि उत्पन्न मिळवणे, अशी दुहेरी कसरत करावी लागत आहे.

वाढत्या भावांचे गणित
उपलब्ध आकडेवारीनुसार, सूर्यफूल तेलाच्या भावात १८ टक्के, साखरेच्या भावात २२ टक्के वाढ झाली आहे. शेंगदाणा तेल आणि चणा डाळीचे भावही वाढले असून, अन्नधान्य खरेदीत सरासरी ७.७४ टक्के वाढ नोंदवली आहे.

ग्राहकांचा विश्वास महत्त्वाचा
फराळाचे भाव वाढविल्यास जुने ग्राहक दुरावण्याची भीती असते. भाव स्थिर ठेवल्यास नफा कमी होतो, तर गुणवत्तेत तडजोड करणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे वाढत्या खर्चाचा भार पेलताना ग्राहकांचा विश्वास कायम राखणे, हे महिला उद्योजिकांसमोरील मोठे आव्हान बनले आहे. या परिस्थितीत त्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर उपाययोजना होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कनॉट प्लेसमधील दुकानं भाजपानं जबरदस्तीनं बंद केली; राहुल गांधींचा भाजपवर गंभीर आरोप; रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची 'महारॅली'

IND vs NZ, 5th T20I: सिफर्टच्या ९३ धावा अन् फिलिप्सने मोडला विलियम्सनचा रेकॉर्ड; न्यूझीलंडने मॅच जिंकली, पण मालिका भारताच्या खिशात

मतांसाठी उमेदवारांची भन्नाट ऑफर! कुठे २,५०० रुपये, तर कुठे चक्क एक किलो चिकन फ्री; मतदानाच्या दिवशी लोकशाहीचे धिंडवडे!

थंडीच्या दिवसांत ओठ फुटतात, कोरडे पडतात? पारिजातकाच्या फुलांपासून बनवा नॅचरल लिप बाम; ओठ राहतील मऊ!

Latest Marathi News Update : रावेरच्या चार भावंडांच्या हत्येचा तपास; IPS कुमार चिंता यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

SCROLL FOR NEXT