मुंबई

पाच्छापूर रस्त्याचा मार्ग मोकळा

CD

पाच्छापूर रस्त्याचा मार्ग मोकळा
वन विभागाची मंजुरी; दिवाळीपर्यंत काम सुरू करण्याचे ठेकेदाराचे आश्वासन
पाली, ता. २ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील पाच्छापूर परिसरातील नऊ गावांना जोडणाऱ्या पाच्छापूर फाटा ते पाच्छापूर रस्त्याच्या कामाचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना भाग-२ (TWT) अंतर्गत राष्ट्रीय मार्ग ९४ ते पाच्छापूर या रस्त्याचे काम मंजूर असून, वन विभागाची आवश्यक पूर्वपरवानगी मिळाल्याने काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संबंधित ठेकेदाराने दिवाळीपर्यंत काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.
या पार्श्वभूमीवर नऊ गावांतील ग्रामस्थांनी आमदार रवींद्र पाटील यांची भेट घेऊन रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली. याबाबत त्यांना निवेदन देण्यात आले. संबंधित ठेकेदार ललित पाटील यांच्याकडेही काम लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
रस्त्याचा बहुतांश भाग वन विभागाच्या हद्दीतून जात असल्याने परवानगीअभावी काम रखडले होते. आता ही मंजुरी मिळाल्याने अडथळा दूर झाला आहे. काम रखडल्यामुळे परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पुढील विलंब टाळून प्रत्यक्ष काम सुरू करावे, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली.
आमदार रवींद्र पाटील यांनी रस्त्याचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तर ठेकेदार ललित पाटील यांनी दिवाळीपर्यंत काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.

नऊ गावांची दळणवळणाची प्रतीक्षा
या निवेदनावेळी बळीराम निंबाळकर, राजू पातेरे, भगवानकाका दिघे, विश्वास चांदे, भावेश दिघे, उमेश तांबट, राहुल महाडिक, संजय बेलोसे, ज्ञानेश्वर बेलोसे आणि सुधीर ठकोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास परिसरातील नऊ गावांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

फोटो ओळ, पाली, ठेकेदार ललित पाटील यांना नऊ गावांचे ग्रामस्थ निवेदन देतांना. (छायाचित्र, अमित गवळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST NCMC Card: कार्डधारकांना फटका! एनसीएमसी सक्तीमुळे एसटी प्रवाशांना भुर्दंड

'येतेच आता मी नांदायला'साठी झी मराठीची ही मालिका घेणार निरोप? यंदा एकही पुरस्कार नाही, शेवटचा भाग कधी?

Latest Marathi News Live Update : पुणे, अहिल्यानगरनंतर धुळे जिल्हा सत्र न्यायालयालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Supreme Court: यंदाच्या दिवळीत फक्त ग्रीन फटाके फोडण्यासच सर्वोच्च न्यायालयाची परवानगी; वेळेची मर्यादाही केली निश्चित

GST Collection : जीएसटी संकलनात महाराष्ट्र देशात अव्वल! ऑक्टोबरमध्ये विक्रमी २३ टक्क्यांची वाढ

SCROLL FOR NEXT