मुंबई

करवाढीविरोधात पालीमध्ये संघर्ष मोर्चा

CD

करवाढीविरोधात पालीमध्ये संघर्ष मोर्चा
नगराध्यक्षांकडून प्रस्ताव स्थगित ठेवण्याचे आश्वासन
पाली, ता. ३ (वार्ताहर) : पाली शहरातील प्रलंबित नागरी समस्या आणि प्रस्तावित घरपट्टी करवाढीच्या निषेधार्थ सोमवारी (ता. २) पाली-सुधागड संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली नगर पंचायतीवर मोर्चा काढण्यात आला. नागरिकांनी नगर पंचायतीला घेराव घालत विकासकामांचा हिशेब जाहीर करण्याची मागणी केली. या वेळी नगराध्यक्ष पराग मेहता यांनी करवाढीचा प्रस्ताव तूर्त स्थगित ठेवण्याचे आश्वासन दिले.
मोर्चादरम्यान आंदोलकांनी विविध मागण्यांचे फलक हातात घेतले होते. फिल्टर पाणी योजनेच्या सद्यःस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी प्रतीकात्मक स्वरूपात फिल्टर नगर पंचायतीला भेट देण्यात आला. तसेच श्री हटाळेश्वर चौक ते बस स्थानक मार्गावरील अतिक्रमणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी फळांचे कॅरेट प्रशासनाला देण्यात आले. शहराला मिळणाऱ्या गढूळ पाण्याबाबत नाराजी व्यक्त करत, २५ वर्षांपासून पाणी योजना श्रेयवादात की राजकारणात अडकली आहे, असा सवालही आंदोलकांनी उपस्थित केला.
नियमित कर भरूनही नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मागील पाच वर्षांतील उत्पन्न, खर्च, पूर्ण झालेली आणि प्रलंबित विकासकामांची माहिती सार्वजनिक करण्याची भूमिका त्यांनी मांडली. पारदर्शकता नसताना करवाढ स्वीकारली जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
या वेळी नगराध्यक्ष पराग मेहता यांनी पुढील बैठकीत नगरसेवक, शहरातील लोकप्रतिनिधी आणि संघर्ष समितीच्या उपस्थितीत करवाढीबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत करवाढीचा विषय स्थगित ठेवण्यात येईल, असे आश्वासन दिले.

नागरी सुविधांबाबत प्रमुख मुद्दे
फिल्टर पाणी योजनेची सद्यःस्थिती आणि पुढील कार्यवाही जाहीर करून सर्व भागांत समान व पिण्यायोग्य पाणीपुरवठा करावा. रस्त्यांवरील वाढते अतिक्रमण आणि अवैध पार्किंगमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर पक्षपात न करता कठोर कारवाई करावी. रखडलेल्या नमो उद्यानाच्या कामाची सद्यःस्थिती स्पष्ट करावी, तसेच शहरात प्रभावी कचरा व्यवस्थापन व्यवस्था राबवावी, अशा प्रमुख मागण्या संघर्ष समितीने केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank New Rules: 'या' बँकेने बदलले नियम! 1 डिसेंबरपासून रोख रक्कम भरणे आणि काढण्यावरही मर्यादा

Aditya Thackeray: ‘एकरी पाच हजारही उत्पन्न मिळणार नाही’; कपाशीची अवस्था पाहून आदित्य ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Chhatrapati Sambhajinagar News: अपहरणाची तक्रार, दहा दिवसांचा शोध अन् अखेर चेंबरमध्ये मृतदेह; करमाडमधील कंत्राटदाराच्या मृत्यूचे गूढ कायम

Latest Marathi News Live Update: महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले

Animal Love Story: शर्यतप्रेमी मालक गेला अन् २४ तासांत लाडका बैलही गेला! २७ वर्षे एकमेकांची साथ; मालक अन् पाखऱ्याच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी

SCROLL FOR NEXT