मुंबई

रायगडात थंडीची चाहूल

CD

रायगडात थंडीची चाहूल
पहाटे धुक्याचे साम्राज्य; डोंगररांगांवरील ढग आणि हिरवाई पर्यटकांना आकर्षित
पाली, ता. ८ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सकाळी आणि रात्री गारवा जाणवू लागला आहे. पहाटे डोंगररांगा, घाटरस्ते आणि परिसरात धुक्याची दुलई पसरत असून, ढग, हिरवाई आणि आल्हाददायक वातावरणामुळे पर्यटनाला चालना मिळत आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पर्यटक आणि ट्रेकर्स किल्ले, घाट तसेच समुद्रकिनाऱ्यांकडे वळत आहेत.
पहाटेच्या वेळी जिल्ह्यातील अनेक भाग धुक्याने व्यापलेले दिसतात. डोंगरांवर पांढरेशुभ्र आणि करड्या रंगांचे ढग दाटून येत असल्याने निसर्गाचा देखणा आविष्कार अनुभवायला मिळत आहे. त्यातच आजूबाजूच्या गर्द हिरवाईमुळे या दृश्याचे सौंदर्य अधिक खुलते. ताम्हिणी, वरंध आणि मोर्बे घाटातून प्रवास करणाऱ्यांना ढगांमधून मार्गक्रमण करण्याचा अनोखा अनुभव मिळत आहे. अनेक प्रवासी या निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेण्यासाठी काही काळ थांबत आहेत.
रायगड, सुधागड, सरसगड, मानगड, सुरगड, मृगगड, विश्रामगड आणि कर्नाळा यांसह जिल्ह्यातील उंचावरील किल्ल्यांवरही धुके आणि ढगांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. त्यामुळे दुर्गप्रेमी आणि ट्रेकर्सना गडभ्रमंतीसोबत निसर्गाचा आनंद घेता येत आहे. दिवाळीच्या सुट्ट्या आणि बदललेले हवामान यामुळे पर्यटनस्थळांवरील वर्दळ वाढताना दिसत आहे.
दरम्यान, मुंबई-गोवा, मुंबई-बंगळूर आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासह जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवर पहाटे धुके व धुरके पसरत आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. वाहनचालकांनी दृश्यमानता कमी असताना वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

निसर्गप्रेमींची वाढती वर्दळ
धुक्याचा आनंद घेण्यासाठी सकाळी फिरायला जाणारे नागरिक, पर्यटक आणि निसर्ग अभ्यासक विविध ठिकाणी दाखल होत आहेत. डोंगरांवरील ढग, हिरवाई आणि पक्ष्यांचा अधिवास पर्यटकांना आकर्षित करत आहे.

कोट :
वातावरणात गारवा पसरत असून, ढग आणि धुक्याची चादर पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. प्राणी-पक्षी आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी अनेकजण येथे येत आहेत. थंडीची चाहूल लागल्याने लवकरच स्थलांतरित पक्ष्यांचेही आगमन सुरू होईल.
— शंतनू कुवेसकर, निसर्ग, प्राणी-पक्षी अभ्यासक, माणगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Munde Midnight Raid and First Posting Revelations : आयुक्त तुकाराम मुंढेंचा खळबळजनक गौप्यस्फोट; २००७ मधील पहिल्याच पोस्टिंगच्या वेळी मध्यरात्रीच्या धाडीचा थरारक किस्सा अन् 'त्या' फोन कॉलबद्दल केला खुलासा

Pimpri Chinchwad fire brigade : गेल्या वर्षी दिवाळीत आगीच्या ७० घटना; यंदा पिंपरी-चिंचवडमध्ये २० अग्निशमन वाहने सज्ज, २२ संवेदनशील ठिकाणांवर २४ तास लक्ष

बॉस असावा तर असा! दिवाळीला प्रत्येकाला दिला १ लाखांचा बोनस, कर्मचारी भावुक; Video Viral

Latest Marathi News Live Update: : शरद पवारांच्या भेटीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या 'सिल्वर ओक'वर जाणार; रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भेटीची मालिका सुरू

Mega Clean River Mission 2029 Deadline : "२०२९ आधी नदी पूर्ण स्वच्छ करूनच जनतेसमोर येणार!"; तब्बल ८,९४१ कोटींच्या मेगा प्लॅनची घोषणा, गृहमंत्र्यांचा मोठा संकल्प

SCROLL FOR NEXT