वणव्यांनी सरसगडाची होरपळ
वृक्षसंपदा नष्ट; पशुपक्ष्यांच्या अधिवासासह अन्नपाण्याचा प्रश्न गंभीर
पाली, ता. १६ (वार्ताहर) ः प्राचीन व ऐतिहासिक सरसगड किल्ल्यावर वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे किल्ल्याची होरपळ होत आहे. तसेच येथील वनसंपदा व पशुपक्षांची वाताहत होत आहे. मागील आठवड्यात सरसगडावर मानवनिर्मित वणवा लागून किल्ल्याचा बहुतांश भाग जळून होरपळला आहे.
वणव्यामुळे किल्ल्यावर नव्याने लावलेले रोपे व संवर्धन केलेली झाडे जळून खाक झाली आहेत. शिवाय येथील माकडे, वानरे व पक्ष्यांच्या अन्नाचा प्रश्न निर्माण होतो. तसेच त्यांचा अधिवास देखील नष्ट झाला. स्थानिक नागरिक व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वणवा विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, मात्र धोकादायक ठिकाणी जाताना आल्यामुळे काही पर्याय उरत नाही. वणव्यांमुळे जळून काळाकुट्ट झालेला किल्ला पाहताना अनेकांना दुःख होते.
शिवाजी महराजांनी या गडाचे महत्त्व ओळखून गडास स्वराज्यात दाखल करून घेतले आणि सरसगडाच्या दुरुस्तीसाठी दोन हजार होण मंजूर केल्या होत्या. यानुसार दुर्गमता व विपूल जलसंचय यावर विशेष भर देऊन गडाची बांधणी करण्यात आली. दुरवर टेहाळणी करण्यास व इशारा देण्यास ‘सरस’ म्हणून किल्ल्यास सरसगड नाव देण्यात आले.
अन्नपाण्यासाठी वाताहत
किल्ल्याच्या चारही बाजूने वणवे लागल्यामूळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट झाली आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या पशुपक्ष्यांची अन्नपाण्यासाठी खूप वाताहत होत आहे. येथे राहणारे पक्षी, माकड, वानरे व इतर प्राणी अन्नपाण्यासाठी पाली शहरात व आजूबाजूच्या गावात येत आहेत. माकडे तर सर्रास गावात हिंडत असतात.
संवर्धनाच्या कामावर पाणी
स्थानिक दुर्गप्रेमी, विविध दुर्ग संवर्धन संस्था व संघटनांकडून गड स्वच्छतेची कामे सुरू आहेत तसेच वृक्षारोपणदेखील केले जात आहे. गड संवर्धनासाठी त्यांचा मोठा वाटा आहे. सततच्या वणव्यामुळे या वृक्षारोपण व संवर्धन कार्यावर पाणी फिरते.
अनेकदा जीवाची बाजी लावून येथील वणवे विझवले आहेत. वणवा लावणाऱ्यांना शोधून कडक शासन करण्याची गरज आहे. गेली अनेक वर्षे सरसगड व इतर ठिकाणी लावलेली व संवर्धन केलेली झाडे सततच्या वणव्यांना बळी गेली आहेत. याचे खूप दुःख होते.
- केतन म्हसके, उपाध्यक्ष, शिवऋण प्रतिष्ठान, पाली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.