मुंबई

वाकण नाक्यावर खड्ड्यांचे साम्राज्य वाहतूक कोंडीने प्रवासी हैराण

CD

वाकण नाक्यावर खड्ड्यांचा विळखा
दुरवस्थेमुळे वाहनांच्या रांगा; प्रवाशांना मनस्ताप, अपघातांचा धोका
पाली, ता. १७ (वार्ताहर) : वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील वाकण नाका ते एकविरा हॉटेलदरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. चहा-पाण्यासाठी थांबणारी वाहने आणि रस्त्याची दुरवस्था यामुळे येथे दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. परिणामी प्रवासी व वाहनचालक हैराण झाले असून, अपघातांचाही धोका वाढला आहे.
कोकणात जाण्यासाठी तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावर पर्यटक आणि प्रवाशांची मोठी वर्दळ असते, मात्र वाकण नाक्यापासून एकविरा हॉटेलपर्यंत ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून, त्यात पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनचालकांना खड्डे चुकवत मार्ग काढावा लागत असून, वाहनांचा वेग मंदावत आहे. परिणामी काही वेळातच वाहतुकीचा खोळंबा होतो.
वाकण नाक्यावर कोकणात जाणारे आणि येणारे प्रवासी चहा-पाणी तसेच विश्रांतीसाठी वाहने थांबवतात. रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे रस्ता अरुंद होतो. त्यातच मुख्य मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग आणखी कमी होतो. विशेषतः रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

दुरुस्तीची प्रतीक्षा
अवघ्या दोन-तीन वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून या राज्य महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले होते, मात्र इतक्या कमी कालावधीत रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित प्रशासनाने वाकण नाका ते एकविरा हॉटेलदरम्यानचे खड्डे तातडीने बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी, तसेच वाहतूक सुरळीत होण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

फोटो ओळ, पाली, वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावर वाकण नाक्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. (छायाचित्र : अमित गवळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Akvan Update: 145 किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ ‘अकवान’; 'या' 13 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

IPL 2027: शमी चा संघ बदलला! लखनौ-राजस्थान मध्ये मोठी ट्रेड, कोणासोबत झाली अदला बदली

MS Dhoni Retire: महेंद्रसिंग धोनीने त्याचा निवृत्तीचा निर्णय CSK ला केव्हा आणि कसा कळवला? म्हणाला, माझं नाव त्यात लिहा...

School Admission: मोठी बातमी! नर्सरी-केजी प्रवेशावेळी डोनेशन मागितल्यास शाळांवर कारवाई; मुलाखती अन् चाचण्याही बंद; वाचा नवे नियम

Amazon: ॲमेझॉनची भारतात 7 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची योजना; 2030 पर्यंत चार सौर आणि पवनऊर्जा प्रकल्प उभारणार

SCROLL FOR NEXT