मुंबई

रायगडमध्ये सापांचा वावर वाढला

CD

रायगडमध्ये सापांचा वावर वाढला
भातकापणी, बदलते हवामान अन् वणव्यांमुळे मानवी वस्तीत शिरकाव; सर्पमित्रांकडून दररोज जीवदानासह जनजागृती
पाली, ता. १८ (वार्ताहर) : हवामानातील बदल, भातकापणीचा हंगाम आणि जंगलातील वणव्यांमुळे रायगड जिल्ह्यात सापांचा मानवी वस्तीत आणि शेतांमध्ये वावर वाढला आहे. उबदार जागा आणि भक्ष्याच्या शोधात विविध प्रजातींचे साप घरांच्या परिसरात, गोठ्यांमध्ये तसेच शेतात आढळत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असले, तरी जिल्ह्यातील सर्पमित्र या सापांना सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडत आहेत. केवळ सापांचे प्राण वाचविण्यापुरते मर्यादित न राहता नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे कामही ते करत आहेत.
रायगड जिल्हा जैवविविधतेने समृद्ध असून, येथे अजगर, दिवड, धामण, नानेटी, घोणस, तस्कर, मांजऱ्या, नाग आणि मण्यार अशा विविध प्रजाती आढळतात. सध्या भातकापणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. कापणीनंतर शेतात उंदरांचा वावर वाढतो. उंदरांच्या शोधात साप शेतातून मानवी वस्तीकडे येतात. याशिवाय बेडूक आणि सरडे यांसारख्या भक्ष्याच्या शोधातही ते घरांच्या आसपास दिसतात. अज्ञान आणि भीतीपोटी अनेकदा सापांना मारले जाते, मात्र सर्पमित्रांकडून त्यांना कोणतीही इजा न करता पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले जात आहे.

भीती दूर करण्यासाठी प्रबोधन
सापांच्या विषारी आणि बिनविषारी प्रजातींमधील फरकाबाबत नागरिकांमध्ये पुरेशी माहिती नसल्याने साप दिसताच घबराट निर्माण होते. अशा वेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच विविध वन्यजीव संस्थांचे कार्यकर्ते घटनास्थळी धाव घेतात. सापांना सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याबरोबरच नागरिकांना त्यांच्या पर्यावरणातील महत्त्वाची माहिती देतात. शेतीचे नुकसान करणाऱ्या उंदरांची संख्या नियंत्रणात ठेवण्यात सापांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

सर्पमित्रांचे अनुभव
बदलत्या वातावरणामुळे सध्या शेतात आणि मानवी वस्तीत सापांचा संचार वाढला आहे. नागरिक आता जागरूक होत असून, घरात किंवा परिसरात साप आढळल्यास तातडीने आम्हाला संपर्क साधतात. आम्ही घटनास्थळी जाऊन सापाला जीवदान देतो आणि वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित अधिवासात सोडतो, असे सर्पमित्र दत्तात्रय सावंत यांनी सांगितले.

भातकापणी आणि हवामानातील बदलामुळे साप अन्नाच्या शोधात बाहेर पडत असल्याने सध्या रेस्क्यू कॉलमध्ये वाढ झाली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सर्पमित्रांशी संपर्क साधावा. प्रत्येक सापाला सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याबरोबरच नागरिकांचे प्रबोधनही केले जात आहे, असे सर्पमित्र व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते दिनेश शिर्के यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lift Rules 2026 : १२ वर्षांखालील मुलांना आता एकट्याने लिफ्ट वापरता येणार नाही; राज्यात नवे कडक नियम लागू, उल्लंघन केल्यास थेट परवाना रद्द!

SMAT 2026: सूर्यकुमार यादव यावेळी मात्र फसला; ललित यादवच्या वादळी खेळीने मुंबईला रडवले, पण तरी हरला गोवा संघ!

Latest Marathi News Live Update : मोर्शी नगरपरिषदेतील 'ओल्या पार्टी' प्रकरणी मोठी कारवाई

Sona Mohapatra On Salman Khan : सैनिकांच्या बलिदानावरचा सिनेमा आणि 'दोन पेग'चं गाणं? सलमान खानवर सोना मोहापात्राचा संताप; म्हणाली, "कोणाच्या करिअरला..."

Success Story: आईने दागिने विकले, बापाने कर्ज काढलं; भावासाठी बहिणींनी शेतात केली मजुरी; लेकाने UPSC मध्ये मिळवली 239 वी रँक!

SCROLL FOR NEXT